पालकमंत्री डॉ. पंकज भोयर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

वर्धा : राज्याच गह (ग्रामीण), गह निर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनीकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. दि. ३० मार्च रोजी पहाटे ५ वाजता सोशालिस्ट चौक येथे आयोजित पाडवा पहाट कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी ८.३० वाजता नागपूर कडे प्रयाण करतील. सायंकाळी ४ वाजता नागपूर येथून वर्धा कडे प्रयाण सायंकाळी ५ वाजता पिपरी मेघे येथे आगमन पिपरी मेघे येथील इको पार्क येथील विकास कामांचा भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी ६.३० वाजता साईबाबा देवस्थान सानेगुरुजी नगर प्रांगण येथे आयोजित संगितमय देवी भागवत ज्ञानदय सप्ताह कार्यक्रमासउपस्थिती. सायंकाळी ७ वाजता बजरंगबली देवस्थान शिवमंदिर इंदिरा नगर आर्वी नाका येथे आयोजित संगितमय देवी भागवत ज्ञानदय सप्ताह कार्यक्रमास उपस्थिती.

दि. ३१ मार्च रोजी सकाळी १० वाजता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कार्यालय येथे आयोजित बक्षिस पुस्तक वितरण समारंभ कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी १२ ते १.४५ पर्यंत राखीव दुपारी २ वाजता सावित्रीबाई फुले सभागृह ग्रामपंचायत जवळ मसाळा येथे आयेाजित महिला दिन कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी ४ वाजता दत्ता मेघे सभागृह येथे आयेाजित लोकमत संखी मंच कार्यक्रमास उपस्थिती. सांयकाळी ७ वाजता डॉ. प्रविण माहेश्वरी यांचेकडे सदिच्छा भेट देतील. दि.१ एप्रिल रोजी सकाळी भाजपा कार्यालयात प्रमख पदाधिका-यासमवेत बैठकीस उपस्थिती. दुपारी १२ ते १ राखीव. दुपारी १ वाजता वर्धा येथून देवळी कडे प्रस्थान करतील दुपारी १. १५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगह नगर परिषद देवळी येथे नाट्यगृह लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. दुपारी २.४५ वाजता देवळी येथून वर्धा कडे प्रयाण करतील. दुपारी ३ वाजता मुरारका ले आऊट लहरी नगर नालवाडी येथे जेष्ठ नागरिक भवनाच्या उद्घाटन समारंभ कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी ५ वाजता वर्धा येथून नागपूर कडे प्रयाण करतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *