
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन ऑफ्रोह महाराष्ट्र या संघटने तर्फे आपलया विविध मागण्यांबाबत दि ९ मार्च २०२६ सोमवार ला सकाळ ११ ते ५ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा समोर धरणे आंदोलन आयोजित केले आहेत. शासनाने अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र तपासणी समितीचे माध्यमातून अनुसूचित जमातीचे अस्सल जात प्रमाणपत्र लबाडीने व फसवणूक करून रद्द केल्यानंतर अधिसंख्य पदावर वर्ग केले आहेत. परंतू सर्वोच्च न्यायालयाच्या २८/४/२०२५ च्या निर्णयानुसार अशा नियमित व स्थायी झालेल्या कर्मचा-यांस अधिसंख्य पदावर वग करता यत नाहीत. अधिसख्य पदावर वर्ग करण्यात आल्यामळ या कर्मचा-यास अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहेत. १) अनुसूचित जमातीतील कर्मचारी पदोन्नतीत पात्र होऊनही पदोन्नती तसच १०/२०/३० वर्षानंतर चे आश्वासित प्रगती योजनेचे लाभ देण्यात येत नाहीत. २) मयत झालल्या कुटबातील सदस्यांना सेवानिवृत्त वेतन देण्यात येत नाहीत. ३) आंतरजिल्हा बदलीचा लाभ देण्यात येत नाहीत, ४) काल्पनिक वेतनवाढ गृहीत धरून वेतनाचा लाभ देण्यात येत नाहीत, ५) खाजगी शिक्षण संस्था अजून ही सेवा समाप्त कर्मचा-यांस सेवेत घेण्यास अडथळे निर्माण करत आहेत.