देशाच्या सामरिक शक्तीला नवी दिशा देण्यात सोलर समूहाचे मोलाचे योगदान- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम नागपूर : जगातील संरक्षणाचे क्षेत्र झपाट्याने बदलत आहे. नवा वर्ल्ड ऑर्डर तयार होत असून व्यापाराचाही शस्त्र म्हणून वापर होत आहे. अशा काळात ज्या देशाजवळ सामरिक शक्ती आणि तंत्रज्ञान आहे, तोच देश भविष्यात आघाडीवर असेल. या दिशेने आपला देश झपाट्याने वाटचाल करत असताना देशाच्या सामरिक शक्तीला नवी दिशा देण्याचे कार्य सोलर समूह करत आहे, असे प्रतिपादन मख्यमत्री दवद्र फडणवीस यांनी आज येथे केले. सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसच्यावतीने मिहानच्या विशेष आर्थिक क्षेत्रात उभारण्यात येणाऱ्या रोबोटिक्स अँड युएव्ही फॅसिलिटी प्रकल्पाच्या भूमिपूजन समारंभात मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस बोलत होते.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, वित्त व नियोजन राज्यमंत्री ड. आशिष जयस्वाल, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार चरणसिंग ठाकूर, सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल, व्यवस्थापकीय संचालक मनीष नुवाल, राघव नुवाल, हर्ष नुवाल आदी मान्यवर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, एकेकाळी संरक्षण सामग्रीच्या उत्पादन क्षेत्रात कुठलीही स्पष्टता नसताना सोलर समूह या क्षेत्रात कार्य करीत राहिला. आज या समूहाने देशातील आघाडीच्या संरक्षण उत्पादन कंपन्यांमध्ये स्थान मिळवले आहे. अत्याधुनिक ड्रोन असो की पिनाका रॉकेटसारखे तंत्रज्ञान असो, देशाच्या सामरिक शक्तीला नवी दिशा देण्याचे कार्य या समूहाने केले आहे. बदलत्या जगात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान, सेमी कडक्टर परिसस्था तसच क्वांटम टेक्नॉलॉजी महत्त्वाची भूमिका बजावित आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संरक्षण तंत्रज्ञान, एरोस्पेस आणि डीपटक क्षत्रासाठी नव धारण तयारकेले. सोलरच्या माध्यमातून या धारणातगत झालली ही सवातमोठी गतवणक आह, याकडमुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्ष वेधले. “राष्ट्रप्रथम’ या विचारातूनसोलर इंडस्ट्रीजची वाटचाल सुरु असताना राज्य शासनाकडून त्यांनासंपर्ू्ण सहकार्य मिळेल, अशीग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.









