जिल्ह्यातील पाच नगर परिषदांच्या प्रचारतोफा थंडावल्या; आज मतदान

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : जिल्ह्यात पाच नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आज २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. पाचही नगरपालिका क्षेत्रात प्रचाराचा धूमधडाका सुरू असून नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी उभे असलेले उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असून सोमवार १ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता प्रचारतोफा थंडावल्या आता मतदारांची वेळ आलेली आहे.

जिल्ह्यातील वर्धा, हिंगणघाट, आर्वी, पुलगाव आणि सिंदी रेल्वे नगरपालिकेची निवडणूक होत आहे. वर्धेत २० प्रभागांमधून ४० नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. ४३ हजार १३८ पुरुष आणि ४४ हजार ८६६ महिला मतदार राहणार आहे.

९९ मतदान केंद्र राहणार आहेत. हिंगणघाटात सुद्धा २० प्रभाग असून ४० नगरसेवक राहणार आहे. ४७ हजार २६५ पुरुष तर ४७ हजार ९१ महिला मतदार असन १०५ मतदान कद्र राहणार आहेत. पुलगावात १० प्रभाग असून २१ नगरसेवक आहेत. १ हजार १९९ पुरुष आणि १४ हजार १६६ महिला मतदार असून ३५ मतदान केंद्र राहणार आहेत. आर्वीत १२ प्रभागासाठी २५ नगरसेवक आहेत. १८ हजार २१९ पुरुष आणि १८ हजार १८८ महिला मतदार असून ४६ मतदान केंद्र राहणार आहे.

सिंदी (रेल्वे) येथे १० प्रभाग असून २० नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. ६ हजार १३४ पुुरुष आणि ६ हजार २५४ महिला मतदार असून १९ मतदान केंद्र राहणार आहे. गत काही दिवसांपासून नगरपालिका क्षेत्रांत प्रचाराची रणधूमाळी सुरू आहेत. नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदासाठी उभे असलेले उमेदवार आपण निवडून आल्यावर काय करणार, याचा पाढाच वाचून दाखवित होते, पण जनताही हुशार असून, मागील आठ वर्षांत सत्ताधारी पक्षाने शहराचे काय हाल केले, याची सरबत्ती करून कानझाडनी करीत असल्याचे काही प्रभागांत दिसून आले. रविवारी प्रचाराचा जोर शिंगेला पोहोचला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *