नामांकन अर्ज छाननीत नगराध्यक्षपदाचे १६ तर सदस्यपदाचे १०१ अर्ज झाले बाद
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : जिल्ह्यातील सहा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता उमेदवारी दाखल करण्याची मुदत सोमवार १७ नोव्हेंबर रोजी संपली. १८ नोव्हेंबर रोजी दाखल अर्जाची छाननी करण्यात आली. त्यात नगराध्यक्ष पदाकरिता आलेल्या अर्जा पैकी १६ तर सदस्य पदाकरिता असलेल्या अर्जा पैकी १०१ अर्ज बाद झाले आहे. वर्धा व हिंगणघाट येथील प्रक्रिया सुरू असल्याने बाद झालेल्या अर्जाची माहिती प्राप्त होऊ शकलेली नाही. देवळी नगरपरिषदेत सदस्यपदाच्या अर्ज छाननीत ३ उमेदवारांचे अर्ज बाद झाले तर ७१ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले.
अध्यक्षपदाच्या अर्ज छाननीत २ उमेदवारांचे अर्ज बाद झाले तर ६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. पुलगाव नगर परिषदेत सदस्यपदाच्या अर्ज छाननीत ७९ नामांकन अर्ज बाद झाले तर १३९ अर्ज वैध ठरले. अध्यक्षपदाच्या अर्ज छाननीत ९ अर्ज बाद झाले तर ८ अर्ज वैध ठरले. सिंदी रेल्वे नगर परिषदेत सदस्यपदाच्या अर्ज छाननीत ५ नामांकन अर्ज बाद झाले तर ९९ अर्ज वैध ठरले. अध्यक्षपदाच्या अर्ज छाननीत सर्व ७ अर्ज वैध ठरले. आर्वी नगर परिषदेत सदस्यपदाच्या अर्ज छाननीत १४ नामांकन अर्ज बाद झाले तर १०४ अर्ज वैध ठरले. अध्यक्षपदाच्या अर्ज छाननीत ५ अर्ज बाद झाले तर ७ अर्ज वैध ठरले.
वर्धा नगर परिषदेमध्ये सदस्यांच्या अर्जाची छाननी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पूण झालली हाती. त्याचवळी अध्यक्षपदाच्या अर्जाची ही छाननी झाल्याचे सांगण्यात येत होते. प्रत्यक्षात तेथे एका उमेदवाराच्या अर्जावर मोठा आक्षेप घेण्यात आला होता त्यामुळे प्रशासकीय कामकाज सुरूच होते. तसेही वर्धा नगरपरिषदेतील कामकाज अत्यंतसथगतीन असल्याच चित्र निवडणुकीचीप्रक्रिया सुरू झाल्यापासून दिसते आहे.हिंगणघाट नगर परिषदेमध्ये सदस्य वअध्यक्ष पदाच्या अर्जाची छाननी प्रक्रिया सायंकाळपर्यंत झाली होती. प्रक्रियेनंतरकिती अर्ज बाद झाले याची रीतसर घोषणा संबंधित अधिकाऱ्यांकडून करण्यात आली नसल्याने माहिती प्राप्त होऊ शकलेलीनाही.









