कापूस-सोयाबीनला भाव नाही; त्यामुळे गांज्याच्या शेतीला परवानगी द्यावी; माजी सरपंचाची मागणी
प्रमोद झिबड/दै.जन-संग्राम समुद्रपूर : तालुक्यातील करूर (पवनगाव) येथील माजी सरपंच मल्हार बाबाराव साबळे यांनी शेतकऱ्यांवरील वाढत्या आर्थिक संकटाचा संदर्भ देत गांज्याच्या शेतीस तात्पुरती परवानगी द्यावी, अशी अनोखी मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी समुद्रपूर तहसीलदारांना निवेदन सादर केले.
निवेदनात त्यांनी नमूद केले की, निसर्गाचा प्रकोप, अनियमित पर्जन्यमान आणि विविध रोगराईमुळे पीक उत्पादन मोठ्या प्रमाणात घटत आहे. त्यातच बाजारात कापूस, सोयाबीन यांना योग्य हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक दशा अत्यंत बिकट बनली आहे. परिणामी अनक शतकरी कजबाजारी होत आत्महत्येस प्रवृत्त होत आहेत.
माजी सरपंचांच्या मते,
शेतकरी योजनांच्या नावाखाली केवळ छुटपुट मदत मिळते. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आणि लाडली बहन योजना मूलभूत अडचणी सोडवू शकत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना आथिक स्थय मिळवण्यासाठी २७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत तरी गांज्याची शेती करण्याची परवानगी द्यावी.
या निवेदनाची दखल घेत समुद्रपूर तहसीलदारांनी पत्र क्रमांक कानूनगो/वलोप/ कावी/-५६१/२०२५ दिनांक २०/११/२०२५ याद्वारे संबंधित निवेदन जिल्हाधिकारी, वर्धा यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविले आहे. आता जिल्हाधिकारी कार्यालय या अनोख्या मागणीवर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.









