प्रधानमंत्र्यांच्या दौऱ्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदारांसोबत केले स्वत:चे उखळ पांढरे
वर्धा/अक्षय मानकर दिनांक २० सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्धा शहरातील स्वावलंबी मैदानावर विश्वकर्मा योजनेचे उद्घाटन करण्याकरीता आले होते. त्यांच्या दौऱ्याकरीता गेल्या १५ दिवसांपासून जोरदार तयारी करण्यात आलेली होती. त्याकरीता स्वावलंबी मैदान येथे भव्यदिव्य असे व्यासपीठ तयार करण्यात आले होते. त्याकरीता सार्वजनिक बांधकाम विभागाने आपत्कालीन तत्वावर कार्यक्रमाकरीता मैदानावर मुरुम भरण्याचे काम केल्या गेले होते. परंतु काल झालेल्या एका पावसामुळे सदर कामाचा दर्जा किती चांगल्या प्रकारचा होता हे सिद्ध झाले आहे. कारण केवळ एका पाण्याचे मैदानाने तलावाचे रुप धारण केले आहे. सदर स्वावलंबी मैदानावर १५०० ट्रक सतत मुरुम भरण्यासाठी नियुक्त करण्यात आले होते.
मुरुम भरण्याचे प्रयोजन असे होते की, मैदान समतल करणे परंतु काल झालेल्या एका पावसामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने पितळ उघडे पडले आहे. आज सदर प्रतिनिधीने मैदानावर फेरफटका मारला असता पावसामुळे मैदानावर जिकडे-तिकडे पाणीच पाणी साचलेले दिसले. यावरुन एक सिद्ध होते की, जर मैदानावर एवढ्या मोठ्या प्रमाणात मुरुम टाकून समतल कल्या गले आह तर तिथ पाणीच पाणी कस कायदिसत आहे. यावरुन या कामामध्ये सार्वजनिकबांधकाम विभागाने स्वत:चे उखळ पांढरे केले अशी चर्चा नागरीकांत दिसून आली. जर कार्यक्रमाच्या दिवशी पाणी आलाअसता तर मैदानाची काय अवस्था झालीअसती हे झालेल्या कामावरुन दिसून येतआह. नागरिकांमध्ये या कामाबाबत बरीचचर्चा रंगतांना दिसून येत असून काल झालेला पाणी कार्यक्रमाच्या दिवशी यायला हवा होता असे मिश्किलपणे चर्चेत बोलल्या जात आहे.