दत्ता मेघे कॉलेज ऑफ फार्मसी व सीएसआयआरचे आयोजन सावंगी येथे दुसरी राष्ट्रीय हेल्थकेअर व टेक्नॉलॉजी शिखर परिषद

 प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन समितीच्या सहकार्याने दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन सस्था अभिमत विद्यापीठ सचालित सालोड हिरापूर येथील दत्ता मेघे कॉलेज ऑफ फार्मसीद्वारे दुसऱ्या हेल्थकेअर अँड टेक्नॉलॉजी शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले.

या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत ५४० प्रतिनिधी सहभागी झाले होते. सावंगी येथील दत्ता मेघे सभागृहात आयोजित या परिषदेचे उद्घाटन एलआयटीयू, नागपूरचे कुलगुरू डॉ. अतुल वैद्य यांनी केले. परिषदेच्या अध्यक्षस्थानी मेघे अभिमत विद्यापीठाचे प्रकुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा होते. यावेळी कुलगुरू डॉ. ललितभूषण वाघमारे, मुख्य समन्वयक डॉ. एस. एस. पटेल, संचालक डॉ. तृप्ती श्रीवास्तव, डॉ. जहीरुद्दीन काझी, दत्ता मेघे कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य तथा परिषद संयोजक डॉ. अनिल पेठे, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. दीपक खोब्रागडे, डॉ. मनीष देशमुख, सहसंयोजक डॉ. सुरेंद्र अग्रवाल, आयोजन सचिव डॉ. राहुल इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी बोलताना डॉ. अतुल वैद्य यांनी संयुक्त संशोधनाची गरज अधोरेखित करीत पारपरिक आषधीज्ञानाच वज्ञानिक प्रमाणीकरण आणि मानकीकरण करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. तर, अध्यक्षीय भाषणात डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी रिव्हर्स फार्माकॉलॉजी या संकल्पनेवर प्रकाश टाकला.

शतकानुशतके वापरल्या जाणाऱ्या नैसर्गिक पदार्थांमधून नवीन औषधांचा विकास केला जात असून प्राचीन ग्रंथांमध्ये उल्लेख केलेल्या या उपचार पद्धतींचे वैज्ञानिक सत्यापन करणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच आयुर्वेद, फार्मास्युटिकल सायन्सेस आणि बहुविषयक संशोधन यांनी एकत्रितरीत्या कार्य करून पारंपरिक औषधांचे फायदे आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध करावेत, असेही डॉ. मिश्रा म्हणाले. परिषदेच स्वागतपर भाषण डॉ. अनिल पेठे यांनी यांनी केले, तर डा. दीपक खाब्रागड यानी आभार मानले.

या परिषदेत एनआयएन हैदराबादचे डॉ. बी. दिनेशकुमार, नागपूरच्या नीरीचे डॉ. सदानद सोनटक्के, आयआयटी गुवाहाटीचे डा. अनिल लिमय, गोवा येथील जीसीसीपीचे डॉ. शैलेन्द्र गुरव, मुंबईच्या आयसीटीचे डॉ. के.एस. लड्ढा, जबलपूर येथील जीएसीचे डॉ. मनोजकुमार दश, ग्वाल्हेरचे प्रो. ग्यानचंद्रन ख्यातनाम शास्त्रज्ञांनी आरोग्यसेवा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नाविन्यपूर्ण आणि बहुविषयक दृष्टिकोनावर विचार मांडले. या परिषदेत २४० हून अधिक शास्त्रीय संशोधन निबंधांचे सादरीकरण करण्यात आले. समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी डॉ. गौरव मिश्रा होते. यावेळी, सीसीआरएस, नवी दिल्लीचे उपमहानिदेशक डॉ. एन. श्रीकांत यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *