अपक्षांसाठी १९४ चिन्ह; तीन निवडा एकावर शिकामोर्तब
पलाश उमाटे/जिल्हा प्रतिनिधी दै.जन-संग्राम वर्धा : जिल्ह्यातील सहा नगरपरिषदांसाठीच्या निवडणुका होऊ घातल्या असून १० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. २६ रोजी चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी १९४ निवडणूक चिन्हांची यादी नप प्रशासनाच्या वतीने तयार करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरताना यापैकी तीन चिन्हांची निवड करावी लागणार असून उमेदवाराला यापैकी एका चिन्हाचे वाटप केले जाणार आहे. २६ नोव्हेंबर रोजी अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल.
भाजपा, काँग्रेस, बसपा, माकप आणि आम आदमी पार्टी यासारख्या राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांना त्यांचे पक्ष चिन्ह दिले जातील. राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्यापक्षांच्या उमेदवारांना त्यांचे पक्ष चिन्ह दिले जातील. अपक्ष उमेदवारांना निवडणूकविभागाने १९४ चिन्हांची यादी तयार केली आहे. या चिन्हांमध्ये बॅट, बॅटमॅन, टॉर्च, नेकलेस, बेल्ट, बेंच, सायकल पंप, रुमाल,रोबोट, ट्रक, ट्यूबलाईट, संगणक, क्रेन, कप होल्डर, डायमंड, डिझेल पंप, डिश ॲण्टिना, भिंतीवरील घड्याळ, हॅण्डल,बुद्धिबळ बोर्ड, लिप, कोट, नारळाचेझाड, नारळ, रंगीत ट्रे आणि ब्रश, कंगवा, संगणक माऊस, मिरची, कार्पेट, कॅरम बोर्ड,बैलगाडी, सीसीटीव्ही कॅमेरा, पंखा आदी चिन्हांचा समावेश आहे.









