सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित जागर संविधानाचा या कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
याप्रसंगी सांस्कृतिक कार्य विभागाचे श्री रुपेश गायधने, सहायक लेखा अधिकारी व श्री कुलदीप कोवे उपस्थित होते. दिनांक ८ नोव्हेंबर २०२५ रोजी संविधान शिल्पकार हे नाट्य सादरीकरण रंगले. लेखक संजय जीवन आणि दिग्दर्शक सांची वंदना संजय जीवने यांच्या मार्गदर्शनाखाली सादर झालेल्या या नाटकाने प्रेक्षकांची दाद मिळवली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आणि संविधान निर्मिती प्रक्रियेचा प्रभावी आढावा या नाटकातून घेण्यात आला.
रविवार, ९ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या जागर संविधानाचा – संगीतमय कार्यक्रमा ने सभागृहात उपस्थित प्रेक्षकांना भारावून टाकले. महाराष्ट्राचे महागायक अभिजीत कोसंबी त्यांचे मोठे बंधू सर नवा ध्यास नवा फेम प्रसंजीत कोसंबी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या गीत, संगीत यातून संविधानातील मूल्ये आणि लोकशाही विचार प्रभावीपणे मांडण्यात आले. कार्यक्रमाचे संकलन व संयोजन सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी केले. श्री. विभीषन चवरे, संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.









