हिंगणघाट नपवरील जप्तीची नामुष्की टळली

सागर वैद्य/तालुका प्रतिनिधी दै.जन-संग्राम हिंगणघाट : आजंती येथील बंधार्यासाठी जमीन अधिग्रहित करण्यात आली. पण, मोबदला न मिळाल्याने महिला तक्रारकर्त्याने न्यायालयाचे दार ठोठावले. न्यायालयाने महिला तक्रारकर्त्याच्या बाजूने निकाल देत मोबदला देण्याचे आदेश दिले. मात्र, नगर पालिकेने मोबदला देण्यास टाळाटाळ केल्याने न्यायालयान जप्तीच आदश निगमित केले.

मात्र, जप्तीची कारवाई हिंगणघाट मुख्याधिकार्यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर मंगळवार ११ रोजी टळली. पंचायत समितीचे सेवानिवृत्त अधिकारी पुंडलिक भेंडे यांच्या पत्नी लिला यांच्या नावाने असलेली ४ एकर जमीन आजंती बंधार्याकरिता नगरपरिषदने सन २००९ मध्ये अधिग्रहित केली होती. मात्र, त्याचा समाधानकारक मोबदला नगरपरिषदेने दिला नव्हता. परिणामी, लिला भेंडे यांनी या संबंधात येथील वरिष्ठ दिवाणी न्यायालयात सन २०१८ मध्ये याचिका दाखल केली. त्या याचिकेवर वरिष्ठ दिवाणी न्यायालयाने याचिकाकर्त्या लिला भेंडे यांना १२ लाख ३२ हजार ७३२ रुपये देण्याचे आदेश दिले.

आदेशाचे पालन न झाल्यास नगर परिषद कार्यालयातील मालमत्ता जप्त करावी, असेही आदेशात नमूद केले. त्या अनुषंगाने मंगळवार ११ रोजी याचिकाकर्ता महिला व त्यांच्या कटुबातील सदस्य न्यायालयाच्या बेलिफला घेऊन हिंगणघाट नगरपरिषदेच्या कार्यालयात पोहोचले. आदेशाची प्रत वाचल्यावर मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांनी तातडीने या संबंधात पुढाकार घेत नगरपरिषद फंडातून ५ लाख ३२ हजार ७३८ रुपयाचा धनादेश याचिकाकर्ता महिलेला सुपूर्द केला. उर्वरित रकम फेब्रुवारी व मार्च २०२६ मध्ये देण्याचे आश्वासन दिले. त्यावर याचिकाकर्त्यांनीही सहमती दिल्याने आज हिंगणघाट नगरपालिकेवर आलेली जप्तीची नामुष्की टळली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *