महाराष्ट्र रोव्हर्स रेंजर्सने पटकावले राष्ट्रीय चषक
यात राज्यातून वर्धा भारत स्काउट्स आणि गाईड्स अंतर्गत देवळीच्या एस. एस. एन. जे. महाविद्यालयातील १३ रोव्हर्स रेंजर्स सहभागी झाले होते. शिबिरातराज्याची संस्कृती व परंपरा यावर आधारित गोंधळ हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून राष्ट्रीय स्तरावरील ततीय कमाकाचा चषक पटकावला. याशिवाय पथसंंचालन,वकृत्व स्पर्धा पोस्टर मेकिंग स्पर्धा, युवा आवाज स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या चमूने प्रावीण्य प्राप्त केले.
महाराष्ट्र रोव्हर्स रेंजर्सच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारत स्काऊट गाईडच्या राष्ट्रीय निदेशक दर्शना पावसकर यांनी सहाय्यक निदेशक बबलू गोस्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र रोव्हर रेंजरचे राज्य समन्वयक तथा रोव्हर स्काऊटचे जिल्हा आयुत कॅप्टन मोहन गुजरकर यांच्या समवेतसहाय्यक रेंजर लीडर कल्याणी लिखार, रेंजर वैष्णवी शिरभाते, आरती मरघडे, तनिषा उईके,यामिनी पारधी, कांचन देशमुख, साक्षी सातव, रोव्हर कुंदन कावडे,विक्की पेंदोरकर, राम देशमुख,विपुल पेंदाम व निशांत शितळेयांना तृतीय क्रमांकाचे राष्ट्रीय चषकदेऊन सन्मानित करण्यात आले. चमूच महाराष्ट भारत स्काऊट गाईडसंस्था, वर्धा जिल्हा संघटक नितेशझाडे, गाईड जिल्हा संघटक वैशाली घोम व प्राचार्य डॉ. सुनिता सोनारे आदींनी अभिनंदन केले.









