उमेदवारी अर्ज भरावा लागेल ऑनलाईन
भाजपाकडन इच्छकांच्या मलाखती पार पडल्याअसून ९ रोजी काँग्रेसनेही इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. नगराध्यक्ष असो वा नगरसेवक पदासाठी निवडणूक लढू इच्छिणा-या उमेदवारांना राज्य निवडणूक आयोगाच्यासंकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ही प्रक्रिया करताना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यानंतरच अर्ज करून अर्जाची प्रिंट निवडणूकनिर्णय अधिकार्यांना सादर करावी लागणार आहे. विशेष म्हणजे एका प्रभागातून एका उमेदवाराला जास्तीत जास्त चार अर्ज भरता येणार आहे. १७ नोव्हेंबर ही अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आहे. सहा नगर पालिकेत नगरसेवक आणि नगराध्यपदाच्या उमेदवारांचे अर्ज स्विकारण्यासाठी वेगळे टेबल लावण्यात येणार आहे. उमेदवारांचे नामनिर्देशन स्विकारण्यासाठी वर्धा व हिंगणघाट नगरपालिकेत किमान ५ टेबल राहणार असून तर उर्वरित चार नगरपालिकांमध्ये कुठे दोन तर कुठे तीन किंवा चार टेबल राहणार आहे.









