आर्वीतील युवा नेतृत्व मनोज आगरकर यांचा भाजपमध्ये प्रवेश; आमदार सुमित वानखेडे यांच्या विकासकामांवर विश्वास
सुहास ठाकरे/दै.जन-संग्राम आर्वी : आर्वी शहरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले युवा नेतृत्व मनोज आगरकर यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांनी आमदार सुमित वानखेडे यांच्या विकासकामांवर व पक्षाच्या राष्ट्रहिताच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त केला. आगरकर यांच्या प्रवेशामुळे आर्वी विधानसभा मतदारसंघात भाजपची संघटनात्मक ताकद अधिक बळकट झाली आहे.
या वेळी भाजप वर्धा जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत ठाकूर, विधानसभा प्रमुख विजय बाजपेयी, शहराध्यक्ष राहुल गोडबोले, युवा मोर्चा अध्यक्षस्वप्निल कठाळे आणि अनेक पदाधिकारी उपस्थित होते. मनोज आगरकर यांच्यासह २७ प्रमुख कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. यामध्ये संजय चींधेकर, कैलास गुप्ता, पंकज मालानी, प्रमोद माहुरे, राजेश आगरकर, अभिजीत भिवगड, मगश इगळ, उमश बारबैले, असलम खान, प्रवीण कांबळे आदींचा समावेश आहे. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व नवागत कार्यकर्त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले आणि आगामी निवडणुकांत राष्ट्रहित व विकासाच्या ध्ययान काय करण्याचा सकल्प व्यक्त करण्यात आला.









