अल्लीपूर येथील आयोजित खंजीरी भजन स्पर्धेला खासदार अमर काळे यांनी दिली भेट
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम अल्लीपूर : येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा खंजीरी भजन स्पर्धे चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा जवळपास तीन दिवस रात्रंदिवस सतत चालल्या. खंजीरी स्पर्धा हे राज्य स्तरीय असल्याने राज्यातून विविध भजन मंडळानी या भजन स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेचे प्रकर्षाने जाणवलेले विषेश म्हणजे या स्पर्धेत मुलींनी व स्त्रीयांनी सुध्दा आपापल्या भजन मंडळामार्फत स्पर्धेत मोठया हिरीरीने भाग घेतला व स्पर्धेत सुरेल आवाजात भजनं सादर कलीत.
या स्पर्धेतील भजन मंडळांनी ज्या उत्साहाने भाग घेतला व या भजन मंडळाच्या स्पर्धा पाहण्यास आलेल्या गावकऱ्यांचा उत्साहबघून खासदार अमर काळे यांनाहीराहावले नाही व त्यांनी लोकांमध्येबसून या स्पर्धेत सादर केलेल्या गाण्यांचा आनंद घेतला. खासदार अमर काळे यांचेमार्फत स्पर्धेतभाग घेतलेल्या भजन मंडळांचा व भजनी मंडळींचा सत्कार करण्यात आला तसेच लहान मुलांना खासदारअमर काळे यांच्या तर्फे महापुरुषांचेफोटो बक्षीस देण्यात आले. या कार्यक्रमाला गावकरी मंडळींसह श्री. सचिन पारसडे, गजानन नरड,प्रभाकर फटींग, विजय कवडे,श्रीराम साखरकर, नाना वांदीले, गोपाल मेघरे, विकास गोठे, संदीपनरड, रोशन नरड, वासुदेव कोडापेयांचेसह मोठया संख्येत गावकरी मंडळी उपस्थित होती.









