स्वातंत्र्याच्या सात दशकानंतरही बोरखेडीवासीयांना चिखलाच्या वेदना

आष्टी/प्रतिनिधी तालुक्यातील बोरखेडी येथीलशेतकर्यांना स्वातंत्र्यानंतरही शेतामध्येजाण्याकरिता चिखल तुडवतजाण्याच्या वेदना सहन कराव्या लागत आहे. त्यामुळे शासनाला याची जाग केव्हा येईल, असा प्रश्नबोरखेडीवासीयांना पडला आहे. सदर रस्ता बोरखेडी-बांबरडा गट ग्रामपंचायतला जोडणारा आहे.दोन गावातील अंतर हे अडीच किमीचे असून या रस्त्यावर शेती असल्याने शेतकर्यांना शेतातजाण्याकरिता चिखल तुडवत जावेलागते. ग्रामपंचायत कार्यालयात जायचे असल्यास ७ किमीचाफेरा घालून जावे लागते. हारस्ता झाल्यास नागरिकांचा त्रास वाचेल. ग्रामपंचायत स्थापन होऊन जवळपास ५० वर्षे झाली. पण ५० वर्षांपासून शासनाला मागणी करूनही शासन किंवा राजकीय पुढार्यांचे याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. रस्त्याअभावी शेतकर्यांना शतीला लागणारे सव साहित्य डोक्याने वाहून न्यावे लागते. पाऊस पडला की पूर्ण वाट बंद पडते.

याच मार्गावर आडवा नाला असून नाल्यातून मार्गक्रमण करताना जीव मुठीत घेऊन नाला ओलांडावा लागतो. जवळपास २ किमीपर्यंत शेती असल्याने चिखलातूनच पायपीट करावी लागते. याच समस्येमुळे शेतात काम करण्यासाठी मजुरही मिळणे दुरापास्त झाले आहे. भरीसभर म्हणून जंगली जनावरांचा त्रास, यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे. हा रस्ता झाल्यास शेतकर्यांच्या समस्या सुटू शकतात. मात्र, शासन व राजकीय नेत्यांच्या दुर्लक्षितपणामुळे शेतकर्यांना चिखल तुडवतच शेती करावी लागत आहे. त्यामुळे या गंभीर विषयाकडे लक्ष देऊन रस्ता बांधकाम करावे, अशी मागणी बोरखेडी येथील शेतकर्यांनी केली आहे.