वर्धा बसस्थानक हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पुरस्काराने सन्मानित

वर्धा/प्रतिनिधी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानात वर्धा बसस्थानकाला अ वग बसस्थानकात नागपर प्रदेशात व्दितीय क्रमांक प्राप्त झाला असून ५ लाख रुपये रोख, चषक व प्रशस्तीपत्र देऊन आगार व्यवस्थापकाला सन्मानित करण्यात आले. मुख्यमंत्री तथा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या हस्ते १ मे २०२३ रोजी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाचा शुभारंभ करण्यात आला होता. १ मे २०२३ ते एप्रिल २०२४ या कालावधीत राबविण्यात आलेल्या या अभियानात वर्धा बसस्थानक नागपूर प्रदेशात व्दितीय क्रमांक प्राप्त झाला.

प्रादेशिक व्यवस्थापक यांच्या हस्ते भंडारा येथे पुरस्काराचे वितरण करण्यात आले होते. यावेळी विभाग नियंत्रक, आगार व्यवस्थापक वर्धा, परिवहन महामंडळाचे अभियंता, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. विभागीय स्तरावर विभाग नियंत्रक यांच्या अध्यक्षतेखाली सर्वेक्षण समिती नेमुन हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेस्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत समितीच्यावतीने प्रत्येक बसस्थानकाचेमूल्यांकन करण्यात आले. त्यामध्येबसस्थानकाची सखोल स्वच्छता, प्रसाधन गृहाची स्वच्छता, बसस्थानक व्यवस्थापन,हरीत बसस्थानक, नियमित करावयाचस्वच्छता, सखोल स्वच्छता, विविधमहोत्सवाचे आयोजन या बाबीचे मूल्यांकन करून गुणांकन देण्यात आले होते. बक्षिसाचीरक्कम बसस्थानकाच्या विकास कामासाठी ववर्षभरात स्वच्छताबाबत उल्लेखनीय कामगिरीकरणार्या कर्मचार्यांसाठी खर्च करण्यातयेणार आहे, असे आगार व्यवस्थापक यांनीसांगितले आहे.