राष्ट्रवादी काँग्रेसची तहसील कार्यालयावर धडक

समुद्रपूर/प्रतिनिधी तालुक्यातील नंदोरी परिसरातील अनेक गावात चकीवादळामळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, या मागणीकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महेश झोटिंग (पाटील) यांच्या नेतृत्वात तहसीलदार कार्यालयावर धडक देऊन तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. समुद्रपूर तालुक्यात २७ मेच्या सायंकाळी चक्रीवादळाने तांडव घातले होते. तालुक्यातील नंदोरी परिसरातील नंदोरी, नारायणपूर, बल्लारपूर, गोविंदपूर, पाठर, जाम, बेलघाट, किन्हाळा, परडा गावात चक्रीवादळाने धुमाकूळ घातला. चक्रीवादळाची तीव्रता एवढी होती की, अनक घरावरील छप्पर उडाल. यामुळे घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घरावरील छताचे पत्रे उडाल्याने छप्पर नसलेल्या घरात अनेक परिवार आपला जीव मुठीत घेऊन हे चक्रीवादळाचे तांडव उघड्या डोळ्यांनी बघत होते. नंदोरी परिसरात झालेल्या चक्रीवादळामुळे शभरपक्षा जास्त विद्युत खांब कोसळून वीजपुरवठा खंडित झाला होता.

वादळ इतके भयानक होते की, नंदोरी परिसरातील चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील वाहतूक देखील वादळामुळे काहीवेळ ठप्प झाली होती. या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाद्वारे तहसीलदारांकडे करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष महेश झोटिंग (पाटील), जिल्हा उपाध्यक्ष अशोक वांदिले, ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, अशोक डगवार, जिल्हा प्रचारप्रमुख संतोष तिमांडे, युवक प्रदेश सचिव प्रशांत लोणकर, गणेश वैरागडे, अमोल बोरकर, हेमंत घोडे, रोशन थुटे, बंडू लिहितकर, अशोक हलवाई, नारायण नवघरे, सोनू मेश्राम, गुड्डू घवघव, मगश बारकट, सशील घोडे, शक्ती गेडाम, राहुल जाधव, गजानन महाकाळकर, राजू मुडे आदी उपस्थित होते.