वर्धेत “स्मृतिगंध’; मूक जीवांनाही मिळेल सन्मानाने शेवटचा निरोप
बर्यावेळा जागेच्या अभावामुळे प्राणी बाहेर टाकावे लागत असल्याने वेदना हातात. याच सवेदनशीलतवर मात करत येथील पीपल फॉर ॲनिमल्सच्या करुणाश्रमात आता “स्मृतिगंध’ची भर पडली. येथे आता आपल्या पाळीव प्राण्यांना सन्मानपूर्वक अंतिम निरोप देता येणार आहे.
पशु, पक्षी समाधी करतात येणार आणि त्यांच्या आठवणी जपण्यासाठी स्मृतीवृक्ष लावता येणार असल्याची माहिती पिपल्स फॉर ॲनिमल्सचे सचिव व युवा समाजसेवक आशिष गोस्वामी यांनी दिली. वर्धेतील पिपल्स फॉर ॲनिमल्सचे आशिष गोस्वामी थेट मनेका गांधी यांच्या संपर्कात आहत. जिल्ह्यात कठही प्राणी विषय पुढे आला की गोस्वामी यांच्या नावाचा उल्लख झाल्याशिवाय राहत नाही. त्यांनी पशु पक्षांसाठी करुणाश्रम नावाची संस्था निर्माण केली. येथे बिबट्या सारख्या हिंस्त्र प्राण्यांसह अनेक प्राण्यांवर उपचार झाले आणि होत आहेत. आर्वी येथील एका माकडाला दारूच्या व्यसनातून मुत केले आहे.
आयुष्य पशु, पक्ष्यांंच्या सेवेत समर्पित केेलेल्या गोस्वामी यांनी जीवंतपणी दाखवत असलेल्या मुया प्राण्यांच्या प्रेमाला त्यांच्या मृत्यूनंतरही सन्मान देण्याची नवीन योजना आखली. पाळीव प्राणी ही एक संकल्पना आता जरा फॅशनकडे वळते आहे. महागडे पशु पक्षी पाळण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. त्या प्राण्यांबद्दल भावना जुळतात.
मात्र, त्यांचा मृत्यू झाल्यावर त्यांचा अन्त्यसंस्कार कठ करावा हा विचार यता. बरेचदा ईलाजस्तव प्राणी कुत्रा मांजर किवा पक्षी बाहेर टाकण्यात येतो. पक्षी असेल तर परिसरात खड्डा खादून परवल्या जातात. परंतु, आता अंगणही सिमेंटची झाल्याने अडचणींमध्ये वाढच होते आहे. प्राण्यांचे स्मशानघाट ही संकल्पना अस्तित्वात नसल्याने बर्याच अडचणी येतात.
वर्धा येथील पीपल फॉर ॲनिमल्स या संस्थेने करुणाश्रम पिपरी येथील जागेत मृत प्राण्यांकरिता अंतिम संस्कार करण्यासाठी जागा उपलब्ध केली असून या संकल्पनेचे नाव स्मृतिगंध असे ठेवण्यात आले आहे. आपण आपल्या घरातील जिवलग प्राण्यास या ठिकाणी समाधी देऊ शकता तसेच स्मृती वृक्ष दखील लाऊ शकता. “स्मृतिगंध’ या ठिकाणी आम्ही प्राण्यांबद्दल प्रेम आणि करुणा यांचा स्पर्श देण्याचा प्रयत्न करतोय. हा उपक्रम फक्त ठिकाण नाही; तो संवेदना आहे, आठवणींचा संगम आहे आणि प्रेमाचं प्रतीक ठरेरल असा विश्वासही त्यांनी व्यत केला.









