कोरा सर्कलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची वाढती ताकद!
हा पक्ष प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा. अतुल वांदिले यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली आणि तालुका अध्यक्ष महश झाटिंग पाटील याच्या प्रमख उपस्थितीत पार पडला. यावेळी श्री संजय धारणे यांची जिल्हा परिषद उमेदवारी जाहीर करण्यात आली, ज्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या प्रसंगी श्री धारणे म्हणाले, मी अनेक वर्षांपासून समाजातील वंचित, शेतकरी, विद्यार्थी आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी लढत आलो आहे.
गावातील पाणी, रस्ता, शिक्षण आणि आरोग्याच्या समस्या सोडवताना जनतेच्या अडचणी जवळून पाहिल्या. मा. अतुल वांदिले यांच्या नेतृत्वाखाली होत असलेले सामाजिक व विकासात्मक कार्य पाहून मला प्रेरणा मिळाली आणि त्यामुळेच मी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला. या कार्यक्रमास महेश झोटिंग पाटील (तालुका अध्यक्ष), दशरथ ठाकरे (जिल्हा सरचिटणीस), अशोक वांदिले (जिल्हा उपाध्यक्ष), गजानन शेंडे (जिल्हा सचिव), संजय लोणकर (तालुका उपाध्यक्ष), गणेश वैरागडे (संचालक कृ.उ.बा.स. समुद्रपूर), महादेवभाऊ वांदिले (कांढळी सर्कल अध्यक्ष), सोहन शेंडे, अशोक वैरागडे, नामदेव वैरागडे आदी मान्यवर उपस्थित होते. या पक्ष प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची ताकद कोरा सर्कलमध्ये आणखी मजबूत झाली असून, स्थानिक राजकारणात नव्या उत्साहाला प्रारंभ झाला आहे.









