वर्धा नपच्या १० प्रभागांमधील ५३ हरकतींवर सुनावणी
उर्वरित ११ ते २० या प्रभागांमधील मतदार याद्यांवर दाखल केलेल्या हरकतींवर सुनावणी घेण्यात येणार आहे. उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे, मुख्याधिकारी विजय देशमुख आणि उपमुख्याधिकारी अभिजित मोटघरे यांच्या उपस्थितीत नगर परिषदेच्या आदरणीय अटलबिहारी वाजपेयी सभागृहात ही सुनावणी घेण्यात आली.
वर्धा नगर परिषदेच्या २० प्रभागांमधील ४० वार्डार्च्या मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आली. मतदार यादीवर आक्षेप नोंदवण्याची अंतिम तारीख१७ आटोबरपर्यंत वाढविण्यात आली. वधनगर परिषदेच्या २० विभागांमधील ४० वार्डातील मतदार यादीवर २६६ हरकती दाखल करण्यात आल्या. १० प्रभागांमधील२० वार्डातील ५३ हरकतींवर आजसुनावणी घेण्यात आली. बहुतेक हरकती स्वीकारण्यात आल्या तर काहींनाच स्थगितीदेण्यात आली. प्रभाग ११ ते २० मधील उर्वरित २० वार्डांसाठी मतदार यादीवर उद्या २८ रोजी सुनावणी होणार आहे.









