आर्वीत भाजपचा झंझावात! : जिल्हा परिषद रोहणा सर्कल निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले!

मलिक पटेल/दै.जन-संग्राम आर्वी : आगामी जिल्हा परिषद रोहना सर्कलच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने जोरदार तयारी सुरू केली आहे. पक्षाचे युवा तडफदार आमदार आणि जनसामान्यांचे लाडके नेते सुमित वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती रोहना व धनोडी सर्कलमध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्य प्रचंड उत्साह आणि विजयाचा आत्मविश्वास संचारला आहे. आमदार सुमित वानखेडे यांनी आपल्या मार्गदर्शनातून कार्यकर्त्यांना विजयाचा मंत्र दिला. त्यांनी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने केलेल्या विकासकामांचा पाढा वाचला आणि या कामांच्या बळावर मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन केले. रोहना व धनोडी सर्कलमध्ये विकासाची गंगा आणण्यासाठी भाजप कटिबद्ध असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. केलेल्या विकासामुळे आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास आमदार सुमित वानखेडे यांनी व्यक्त केला.

यावेळी, भाजपचे वर्धा जिल्हा कार्यालय प्रमुख श्रीधर देशमुख आणि वर्धा जिल्हा चिटणीस राजा पावडे यांनीही प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले. त्यांनी संघटनात्मक बांधणी आणि प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या महत्त्वावर जोर दिला. या बैठकीला सर्कल प्रमुख राजूहिवसे, मंडळ अध्यक्ष राजू ठाकरे, माजी पंचायत समिती सदस्य वैभव जगताप, ज्येष्ठ नेते वसंत शिरसाम, अशोक कालोकार, राजू कुकडे,पुरुषोत्तम ठाकरे, आणि युवामोर्चा तालुका अध्यक्ष आशिषटिकले यांच्यासह पंचायत समिती धनोडी सर्कल मधील सर्व प्रमुख पदाधिकारी, बूथ प्रमुख, शक्तीकेंद्रप्रमुख आणि ज्येष्ठ कार्यकर्तेमोठ्या संख्येने उपस्थित होते.

युवा नेतृत्वाचा अनुभव आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद या समन्वयातून रोहनासर्कलमध्ये भाजपला अभूतपूर्व यश मिळेल, असा विश्वास सर्वच नेत्यांनीव्यक्त केला. रोहना सर्कलच्या विकासासाठी आणि मजबूत लोकशाहीसाठी या निवडणुकीत पुन्हा एकदा ‘कमळ’ फुलवण्यासाठी सज्ज्ा व्हा! असे आवाहन आर्वी तालुकाध्यक्ष राजू ठाकरे यांनी केले. या मेळाव्यातरोहना व धनोडी सर्कल मधील भाजपापदाधिकारी व कार्यकर्त्यांची लक्षणीयउपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *