शिवराय अवमानाचा सूत्रधार उघड! संभाजी ब्रिगेडचा तालुकाध्यक्ष रोहन हिवाळे अटकेत!

मलिक पटेल/दै.जन-संग्राम आर्वी : समाजात धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण करून महापुरुषांचा आणि देव-देवतांचा घोर अवमान करणाऱ्या “मैथिली पालीवाल’ या वादग्रस्त फेक फेसबुक अकाऊंटचा सूत्रधार उघड झाला आहे. हा फेक आयडी दुसरा-तिसरा कोणी नसून, संभाजी बिगडचा तालकाध्यक्ष राहन हिवाळ असल्याचे उघडकीस आले आहे!

या धक्कादायक घटनेने आर्वी तालुक्यात संतापाचा आगडोंब उसळला आहे. रोहन हिवाळे ऊर्फ “मैथिली पालीवाल’ या खोट्या नावाने चालवल्या जाणाऱ्या अकाऊंटवरून गेल्या वर्षभरापासून छत्रपती शिवाजी महाराज, गजानन महाराज, भिकाजी महाराज यांच्यासह अनेक पूजनीय व्यक्तिमत्त्वे आणि धार्मिक भावना दुखावणाऱ्या पोस्ट शेअर केल्या जात होत्या.

यामुळे समाजात तणाव निर्माण झाला होता. आमदार सुमित वानखेडे यांनी केलेल्या एका फेसबुक पोस्टवरील चर्चेदरम्यान, त्यांनी थेट या फेक आयडीचा उल्लेख केला आणि त्याचे पितळ उघड झाले. आपली बदनामी झाल्याचा कांगावा करत हिवाळे जेव्हा पोलिसांत फिर्याद नोंदवायला गेला, तेव्हा पोलिसांनी चौकशीदरम्यान त्यालाच उलट अडकवले. अखेर, त्याने हा फेक आयडी आपणच चालवत असल्याची कबुल दिली! एका विशिष्ट समाजाच्या महिलेच्या नावाने फेक अकाऊंट तयार करून समाजात विषारी विचार पसरवण्याचा प्रयत्न, समाजात धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण करण्याचा हा प्रकार अत्यंत लज्ज्ाास्पद आहे. त्यामुळे आर्वीकर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कलम २९९ अन्वये रोहन हिवाळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एका महिलेच्या नावाआड लपून समाजात विषारी विचार पसरवणे, हेच याचे पुरुषार्थ का? असा संतप्त सवाल आर्वीकर नागरिक करत आहेत. या समाजविघातक कृत्याबद्दल त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरांतून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *