बोगस बियाणे विक्रीच्या रॅकेटचे धागेदोरे उत्तर प्रदेशपर्यंत

वर्धा/प्रतिनिधी वर्ध्यातील म्हसाळा परिसरातीलइमारतीत बोगस बियाण्यांचा चक्क कारखानाचचालविला जात असल्याचा छडा लावत पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. या प्रकरणीसेवाग्राम पोलिसांनी १५ आरोपींविरुद्ध गुन्हादाखल करून नऊ जणांना अटक केली होती. याच प्रकरणात दहावा आरोपी कोमलकांबळे (रा. सोनेगाव बेला, जि. नागपूर) याला अटक करून कृषी सेवा केंद्रातूनबोगस कपाशी बियाण्यांची ७४ पाकिटे जप्तकेली आहेत. पोलिसांनी विविध नामांकित कंपन्या वकपाशीच्या बनावट बियाण्यांची २९६ पोतीजप्त करून तब्बल एक कोटी ५५ लाख ८३हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बोगस बियाणे विक्रीच्या रॅकेटचे धागेदोरे संपूणराज्यात पसरले असल्याने पोलिसांकडून त्यादिशेने जलदगतीने तपास सुरू असल्याची माहिती आहे.

आतापर्यंत गुजरातच्या दोघांना दिले १७ लाख रुपये

या रॅकेटचा मुख्य सूत्रधार राजू जयस्वाल याने गुजरात येथील अहमदाबाद जिल्ह्यातील ईडर येथील राजूभाई आणि महेंद्रभाई यांच्याकडून बोगस बियाणे मागवले होते. त्याचे आतापर्यंत आरोपीने १७ लाख रुपये त्यांना दिल्याची माहिती आहे. मात्र, १२ रोजी पुन्हा दोन ट्रक बोगस बियाणे मागवले. पोलिसांनी मात्र आरोपीचा डाव उधळून लावला.

पशुचिकित्सक करायचा “सेलिंग’

पोलिसांनी हमदापूर येथून अटक केलेला आरोपी विजय अरुण बोरकर हा जनावरांचा डॉक्टर होता. तो गावागावांत जनावरांवर उपचारासाठी जाताना बोगस बियाण्यांचीपाकिटे घेऊन त्याची शेतकऱ्यांना विक्रीकरीत होता. मात्र, पोलिसांनी त्याचा डाव उधळून लावला.

आरोपींना २१ पर्यंत पोलिस कोठडी

पोलिस निरीक्षक धनाजी जळक यांनी आरोपी मुख्य सूत्रधार राजू सुभाष जयस्वाल (वय ३३, राजकुमार यादव वडमे(वय ३९) दोघेही रा. रेहकी, ता. सेलू, जि. वर्धा, विजय अरुण बोरकर (वय ३७) गजानन सूर्यभान बोरकर (वय ४५) दोघेही रा. हमदापूर,जि. वर्धा), हरीशचंद्र वासुदेव उईके (१८, रा. ऐजोसी, जि. जौनपूर, उत्तर प्रदेश), धरमसिंग बंरीहार यादव (२७, रा. उत्तर प्रदेश), सुदामा शिवा सोमकुवर (२७) अमन शेषराव धुर्वे(१८) दोघेही रा. लास, जि. छिंदवाडा), महमूद गफ्फार चव्हाण (४५, रा. तिवरंग, जि. यवतमाळ), कोमल कांबळे (रा. सोनेगाव बेला, जि. नागपूर) यांना न्यायालयात हजर केले असता, आरोपींना २१ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.