अखिल भारतीय चरखा संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रीय ऑनलाइन परिसंवाद
या संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त (१९२५-२०२५) खादी मिशन सेवा ट्रस्ट आणि मुदित शिक्षण संस्था, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय राष्ट्रीय ऑनलाइन परिसंवाद आयोजित करण्यात येत आहे. हा परिसंवाद १५ ते १७ ऑक्टोबर २०२५ दरम्यान दररोज सायंकाळी ६:३० वाजता ऑनलाइन माध्यमातून होणार आहे. कार्यक्रमाचे संयोजक डॉ. पंकज कुमार सिंग यांनी सांगितले की, या परिसंवादात देशभरातील खादी संस्था, गांधीवादी कार्यकर्ते, खादीप्रेमी, प्राध्यापक आणि विद्यार्थी सहभागी होतील. सर्वांना जोडण्याचे आणि कार्यक्रम सुरळीतपणे चालवण्याचे काम मदित बाल विद्यालयाच्या प्राचाया अपर्णा सिंह यांच्या नेतृत्वाखाली केले जाईल.
या परिसंवादात विविध विषयांवर विचार मांडणारे प्रमुख वक्ते – प्रो. (डॉ.) उल्हास जाजू (सेवाग्राम), प्रो. पुष्पेंद्र दुबे (मॅनेजिंग ट्रस्टी, खादी मिशन सेवा), महेश कुमार सिंग (एमगिरी), डॉ. राजीव रंजन गिरी (दिल्ली विश्वविद्यालय), डॉ. भारती देवी, जवाहरलाल सेठिया (राजस्थान खादी ग्रामोद्योग संस्था संघ), अशोक कुमार शरण (माजी संचालक, खादी आणि ग्रामोद्योग आयोग), मुकेश लुतडे (मगन संग्रहालय), प्रो. आर. पी. द्विवेदी (महात्मा गांधी काशी विद्यापीठ, वाराणसी), चिन्मय वसंत फुटाणे (ग्राम सेवा मंडळ, गोपुरी) आणि प्रो. नृपेन्द्र प्रसाद मोदी (महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ) आपले विचार मांडतील. दररोज एक मुक्त सत्र देखील ठेवण्यात आले आहे, ज्यात सर्व सहभागी आपले विचार आणि अनुभव शेअर करू शकतील.









