संघ शताब्दी वर्षानिमित्त श्री विजय दशमी उत्सव कार्यक्रम मोठ्या थाटात साजरा

प्रमोद झिबड/दै.जन-संग्राम समुद्रपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी माऊली सभागृह वायगाव हळद्या येथे मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात १२ ऑक्टोंबर २०२५ ला सायंकाळी ६ वाजता पतसंंचालयाने झाली.स्वयंसेवक सर्व गणवेशात शिस्त पद्धतीने व रितीने सहभागी झाले.

या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणुन भारतीय विचार मंचचे प्रांतीय सदस्य अतुल शेंडे वर्धा यांनी संघाच्या शतकीय प्रवासात भारतीय समाजाची साथ जर संघाला मिळाली नसती तर प्रत्येक पावली आव्हानांनी भरलला हा प्रवास सघ इथपयत यशस्वीरीत्या करु शकला नसता आणि म्हणुन संघ आणि समाज हे भिन्न भिन्न नसून हिंदुत्वाच्या संरक्षण व संवर्धनात परस्पर पुरक व सहाय्यक आहेत आणि देवभूमी भारताच्या मातीतला येथील नागरिकांच्या रक्ता रक्तात भिनलेला हम सब एक हैं हा संस्कार भाव हच भारताच्या राष्ट्रियत्वाच एकता आणि अखंडतेचे मूळ गमक आहे. असे प्रतिपादन केले.

वर्तमानात जातीयतेच्या गटागटात विखुरलेला विभाजित दिसणारा भारतीय समाज हे भारताचे मूळ समाज स्वरुप नसून हा एक भटकाव आहे. आणि केवळ स्वबोध आत्मबोध यानेच आपण परत आपली समाजाची विस्कटलेली घडी ठिक करु अशी आश्वस्तता याप्रसंगी बोलतांना त्यांनी व्यक्त केली. श्री हनुमान देवस्थान पंचकमेटीचे श्रावणजी चांभारे उत्सवाचे मुख्य अतिथि यांनी वर्षाशताब्दी निमित्त संघाला शुभेच्छा दिल्या व श्री विजयादशमी उत्सवाचे प्रास्ताविक तालुका संघचालक रवीजी गाठे यांनी केले.स्वयंसेवक वंश बावणे अमृतवचन तर प्रशांत कोटांबकर यांनी सुभाषित व हेमंत खडतकर यांनी वैयक्तिक उत्कृष्ट आवाजात गीतगायन केले.नंतर प्रमुख वक्ता अतुल शेंडे यांचे उद्बोधन झाले, खंड कार्यवाह हर्षल श्रावणे व अन्य स्वयंसेवकांच्या निमंत्रणाला गावातील प्रबुद्धजन नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *