ग्रामीण रुग्णालयातील भोंगळ कारभार उघड

कोमल खांडेकर सह विपिन कडू /दै.जन-संग्राम पुलगांव : दिनांक १३/१०/२५ रोजी रुग्णनामे रोहित वर्गने राहणार कासारखेड याला डॉक्टर नेत्ररोग तपासणी तपासणी करिता तारीख बाह्य मलम डोळ्याला लावण्याकरिता देण्यात आले मलम लावल्याबरोबरच संबंधित रुग्णाला खाज आणि जळण चा प्रकार सुरू झाला त्याची दक्षता घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हाप्रमुख आशिष पांडे पुलगाव शहर प्रमुख संदीप कुचे,सुधीर काकडे,माजी शहर विद्याधर मातने बंटी ढगे, प्रफुल कुंबरे, सर्वे श धाबेकर आणि सर्व इतर शिवसैनिकांनी ग्रामीण रुग्णालय येथे गाठून जिल्हा शल्य चिकित्सक यांना विचारणा केली .विचारणा केली असता त्यांनी नेत्ररोग तज्ञ ची टीम पुलगाव ग्रामीण रुग्णालय येथे हजर करून संबंधित रुग्णाची तपासणी केली . विषय हा नाहीये की एकाच रुग्णाला ही औषध देण्यात आली विषय असा आहे की सकाळपासून जवळपास नेत्ररोग तपासणीचे ७२ पेशंट बहात्तर रुग्ण संबंधित नेत्ररोग डॉक्टरने तपासले त्या रुग्णांना हेच तारीख बाह्य औषध देण्यात आली का याची चौकशी करण्यात यावी तसेच पुलगाव ग्रामीण रुग्णालय येथे आणखी तारीख बाहेर औषधीचा साठा असल्याचे नाकारता येत नाही त्याचीही चौकशी शल्य चिकित्सक अधिकाऱ्यांनी ही मागणीच निवेदन पुलगाव पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले असे न झाल्यास शिवसेना आपल्या पद्धतीने आणखी तीव्र आंदोलन करेल असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *