दिव्यांगांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा- जिल्हाधिकारी वान्मथी सी.
दिव्यांग व्यक्तींर्साठी पुढाकार घेऊन कामे करा, त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा, अशा सचना जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात ‘दिव्यांग हक्क अधिनियम २०१६’ अन्वये दिव्यांगांप्रती संवेदनशीलता जागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत हात्या.
याप्रसगी मख्य कायकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा विधीसेवा प्राधिकरणचे सचिव विवेक देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमंत वाघ, जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रतिभा भागवतकर यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी वान्मथी सी. पुढे म्हणाल्या, प्रत्येक दिव्यांग व्यक्तीपर्यंत पोहचून त्यांना शासकीय योजनांचा लाभ देणे गरजेचे आहे, यासाठी कार्यशाळा, मेळावे आदींचे आयोजन करावे.
कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक दिव्यांग व्यक्तीच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यांना सहकाय कराव. या कायशाळतन दिव्याग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ मधील नियमांच्या तरतुदी व नियमांची माहिती सविस्तर जाणून घ्या व समाजामध्ये दिव्यांग व्यक्तींर्साठी पुढाकार घेऊन कामे करा, असे त्यांनी सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण म्हणाले, समाजातील दिव्यांगांसाठी संवेदनशीलता ठेवून काम करणे गरजेचे आहे.
दिव्यांगांना त्यांच्या हक्काच्या बाबी त्यांना मिळवून देण्यासाठी सहकार्य करा. शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे ड. श्री. सावरकर यांनी दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ मधील दिव्यांगांच्या डिसॅबलिटीचे प्रकार, सर्टिफिकेट, तक्रार, शिक्षणामधील तरतूद, सामाजिक पुनर्वसन, कायद्याची अंमलबजावणी, शिक्षेची तरतूद आदींची सविस्तर माहिती दिली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमंत वाघ यांनीही आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना, यूडीआयडी कार्ड मिळविण्याची पध्दत आदींची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिभा भागवतकर यांनी केले व कार्यशाळा आयोजनाबाबतची भूमिका स्पष्ट केली. संचालन नितीन कठाणे यांनी केले तर उपस्थितांचे आभार किशोर थुल यांनी मानले.









