हिंगणघाटमध्ये उद्रेकाचा स्फोट! – आता अन्नत्यागाचं रणसंग्राम सुरू!

 प्रणय बालपांडे/दै.जन-संग्राम हिंगणघाट : हिंगणघाटच्या हृदयातपेटलेल्या असंतोषाच्या आगीत आतासंघर्षाचं इंधन टाकलं गेलं आहे. कलोडे सभागृहासमोरील अवैध झोपडपट्टीहटवा आणि नागरिकांचं पुनर्वसन करा या मागणीसाठी झोपडपट्टी हटाव संघर्ष समितीचं सुरू असलेलं ठिय्या आंदोलन आता निर्णायक वळणावर पोहोचलंआहे. ११ ऑक्टोबरपासून सकाळी ११ वाजता अन्नत्याग आंदोलन सुरू होणार असून, हा संघर्ष आता थांबणारा नाही, हे नागरिकांनी ठामपणे जाहीर केलं आहे.

आता न्याय मिळाल्याशिवाय उठणार नाही ठिय्या, आणि थांबणार नाही लढा! प्रशासन बधिर – जनता भडकली!

६ ऑक्टोबरपासून तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनाकडे प्रशासनाने थंड आणि मुर्दाड भूमिका घेतल्यामुळे लोकांचा संयम तुटला आहे. प्रशासन फक्त टेबलावरच्या फाईलीझाडायला बसलंय का? असा रोष व्यक्त करत लोक रस्त्यावर उतरले आहेत.

सावध रहा- इशारा थेट प्रशासनाला!

आमच्यात कोणाच्याही जीवाला धोकापोहोचला, तर जबाबदार कोण? संपूर्ण प्रशासन! – संघर्ष समितीचा थेट इशारा हे शब्द केवळ संताप नाहीत – ते उद्रेकाचं स्पष्ट संकेत आहत. आदालनाच्या पुढील टप्प्यात कोणतीही अप्रिय घटना घडली, तर त्याचं सर्वस्वी उत्तरदायित्व प्रशासनावरच असणार आहे, असा इशारा लेखी स्वरूपात देण्यात आला आहे.

सामाजिक आणि राजकीय संघटनांचा पाठिंबा – वातावरण तणावपूर्ण!

विविध संघटनांनी आंदोलनास पाठिंबा जाहीर कला असून, शहरात चिघळलेलं वातावरण दिवसेंदिवस तापत आहे. नागरिक प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत हिंगणघाटमध्ये प्रशासन आहे तरी का? आता सरकारला जाग येणार का? संपूर्ण शहर आज एका अस्वस्थतेच्या सावटाखाली आहे. न्याय की अन्याय? हा प्रश्न प्रत्येक नागरिकाच्या ओठांवर आहे. येत्या काळात आंदोलन आणखीन उग्र होणार, हे निश्चित आहे. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी प्रशासनाने तात्काळ आणि ठोस निर्णय घ्यावा, अशी स्पष्ट मागणी केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *