सेवा पंधरवड्यातून हजारो नागरिकांना विविध शासकीय सेवांचा थेट लाभ- पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा २०२२ मध्ये प्रथम आपण वर्धा जिल्ह्यात राबविला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाची राज्यभर अंमलबजावणी केली. त्यामुळे जिल्ह्याच्या या उपक्रमातून राज्यभर हजारो नागरिकांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ मिळत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले. राष्ट्रनेता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस दि.१७ सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दि.२ ऑक्टोंबर दरम्यान आयोजित सेवा पंधरवड्याचा समारोप आज पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत विकास भवन येथे झाला. त्यावेळी ते बोलत हाते. कायकमास जिल्हाधिकारी वान्मथी सी, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपविभागीय अधिकारी दिपक कारंडे, तहसिलदार संदीप पुंडेकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावर्षी सेवा पंधरवडा तीन टप्प्यात राबविण्यात आला. पहिल्या टप्प्यात पांदन रस्त्यांची मोहिम घेण्यात आली.

यामुळे जिल्हाभरातील पांदन रस्ते मोकळे होऊन त्यांना नंबर प्राप्त होणार आहे. दुसरा टप्पा घरकुलासाठी जागा उपलब्ध नसलेल्या नागरिकांना पट्टे वाटपाचा होता. अनेक नागरिकांना पंधरवड्यात पट्ट उपलब्ध झाल्यान त्यांना हक्काच घर उपलब्ध होण्याचा मार्ग निर्माण झाला आहे. तिसऱ्या टप्प्यात विविध प्रमाणपत्र, दाखले वाटपाची मोहिम राबवून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे पुढे बोलतांना पालकमंत्री डॉ.भोयर म्हणाले. विविध विभागांच्यावतीने विविध नाविण्यपुर्ण उपक्रम पंधरवड्यात राबविण्यात आले. जिल्ह्यात पांदनरस्ते, पट्ट्यांचा चांगला उपक्रम या दरम्यान झाला आहे. जिल्हा प्रशासनाने सेवा पंधरवडा अतिशय चांगल्या पद्धतीने राबविल्याने जिल्ह्यात चांगले काम होऊ शकले.

जिल्हा प्रशासनाचे काम कौतुकास्पद ठरले, असे पालकमंत्री म्हणाले. जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी पंधरवडा कालावधीत सर्वच विभागांनी चांगले काम केले. हे काम पुढेही असेच सुरु राहील, असे सांगितले. प्रास्ताविकात उपविभागीय अधिकारी दिपक कारंडे यांनी पालकमंत्री डॅा.पंकज भोयर यांच्या संकल्पनेतून सेवा पंधरवडा राबविण्यात आला. पंधरवड्यातील उपक्रमात २६ विभागांनी सहभाग नोंदविला. हजारो नागरिकांना थेट सेवा यामाध्यमातून उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचे सांगितले. यावेळी विविध योजनांच्यालाभार्थ्यांना पालकमंत्र्यांच्याहस्ते लाभ, प्रमाणपत्र, पट्ट, दाखल्याचे वाटपकरण्यात आले. तसेच सेवा पंधरवड्यातउत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी,कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचलन नायब तहसिलदार अजय धर्माधिकारी यांनी केले तर आभार तहसिलदार संदीप पुंडेकर यांनी मानले. कार्यक्रमास वर्धा उपविभागातील नागरिक, लाभार्थी, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *