आर्वी तालुक्यात अनधिकृत गौण खनिज वाहतूकीवर कारवाई; ट्रॅक्टर जप्त, फौजदारी गुन्हा दाखल

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वधा : आर्वी तालुक्यातील विरूळ येथे अवैध रेती वाहतूक करणाऱ्या विरोधात तहसील कार्यालय व पोलिस विभागाच्या संयुक्त पथकाच्यावतीने कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत एक ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे. परवानगी न घेता अनधिकृतपणे गाण खनिज वाहतक हाणार असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्या आधारे तहसील कार्यालय व पलगाव पोलिस स्टेशनचे संयुक्त पथकाने दिनांक ९ ऑक्टोंबर रोजी मध्यरात्री विरूळ येथे अनधिकृत रेती वाहतूक करत असताना हिरव्या रंगाच्या ट्रॅक्टरवर ही कारवाई केली.

वाहनचालकाकडे चौकशी केली असता ट्रॅक्टर सालफळ येथील असल्याचे समजले. सदर वाहनचालक जवळ कोणताही वाहतूक परवाना नसल्याने ट्रकटर जप्त करून पोलिस स्टेशन पुलगाव येथे जमा करण्यात आला. सदर वाहनावर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. पोलिस स्टेशन, पुलगाव येथे भारतीय न्याय संहिता अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाइ जिल्हाधिकारी वान्मथी सी, उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाठ, तहसीलदार हरीश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार साईकिरण आबुलवार, पोलिस उपनिरीक्षक सदानंद बडदकर, महसूल सहायक सागर झाडे, पोलिस शिपाई सोमेश गंथाडे यांच्या संयुक्त पथकाने केली. मागील काही दिवसांपासूनअवैध गौण खनिज व अवैधरेती वाहतूक करणारे महसूलविभागाच्या रडारवर असल्यानेसातत्याने कारवाई केल्या जातआहे. त्यामुळे अवैध गौण खनिज व रेती वाहतुकीस आळा बसल्याचेदिसून येत आहे. आर्वी तालुक्यातबेकायदा रेती उपसा व वाहतूक करणाऱ्यांविरोधात यापुढही अशीचकडक कारवाई करण्यात येणारअसल्याच तहसीलदार हरीश काळव पोलिस निरीक्षक यशवंत सोलसेयांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *