जिल्ह्यातील १३२ क्षयरुग्णांना पौष्टिक किटचे वाटप
या कार्यक्रमाला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमंत वाघ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्निल बेले, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हेमंत पाटील, सहायक संचालक (कुष्ठरोग) डॉ. राजेश्वर पराडकर, डीपीपीएम प्रोग्राम कोर्डिनेटर जितेंद्र बाखडे, उमेदचे नीरज नखाते, मनीष कावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. समुदाय सहाय्यता प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान या उपक्रमांतर्गत नयारा एनर्जी, अंमलबजावणी संस्था आणि टीबी विभाग सक्रियपणे कार्यरत आहेत.
क्षयरुग्णांना योग्य पोषण मिळावे आणि त्यांना पुन्हा क्षयरोग होण्याचा धोका कमी व्हावा, यासाठी हा प्रकल्प जिल्हा क्षयरोग केंद्र आणि वर्धिनी सेवा संघ यांच्यामार्फत पुढील तीन वर्षांसाठी राबवण्यात येणार आहे. वितरित करण्यात आलेल्या पौष्टिक किटमध्ये ५ किलो मल्टीग्रेन आटा, १ किलो गूळ, १ किलो शेंगदाणा तेल, १ किलो तांदूळ, १ किलो तूरडाळ, १ किलो चना, १ किलो मूग डाळ आणि २०० ग्रॅम तूप यासारख्या महत्त्वपूर्ण अन्नसामग्रीचा समावेश आहे. क्षयरुग्णांना योग्य आहार मिळाल्यास त्यांच्या उपचारांना माठी मदत हात, यावर भर दण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन सुजीत ढोबळे यांनी केले. उपप्रादेशिक क्षयरोग अधिकारी श्री. बाखडे यांनी आभार मानले. जिल्ह्यामध्ये क्षयरोग निमर्ूलनासाठी जिल्हा क्षयरोग केंद्र आणि वर्धिनी सेवा संघामार्फत हे कार्य निरंतर सुरू आहे. वर्धिनी सेवा संघाच्या अध्यक्षा संगिता गायकवाड, सचिव अर्चना फुकट, कोषाध्यक्ष गीता मुळे, सदस्य वनिता आधुलकर, संगिता शेंद्रे, ललिता चौधरी, तेजल ठवकर, माया देवळीकर, वनिता ठाकूर यांच्याद्वारे अंमलबजावणी केली जात आहे. याप्रसंगी टीबी विभागातील सर्व कर्मचारी व रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते.









