देवळी शहराचा विकास करावयाचा असेल तर सकारात्मक विचार घेऊन पुढे जायला हवे- माजी खा. रामदास तडस

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम देवळी : रावण फार महाज्ञानी आणि विद्वान शासक होता व शिवभक्त होता. परंतु रावणाला आपल्या ज्ञानाचा, साधनेचा अहंकार होता. आपल स्वामित्व सिद्ध करण्यासाठी असत्य बोलणे, अन्याय करणे, अनीतीच्या मार्गाचा अवलंब करणे असे अनेक दुगर्ुण रावणाला चिकटले. त्याचा नाश सत्यवचनी, न्यायी, नीतिमान अशा श्रीरामाने केला. सत्याचा असत्यावर, न्यायाचा अन्यायावर तसेच नीतीचा अनीतीवर विजय झाला म्हणून या दिवशी विजयादशमी हा सण साजरा केला जातो.

आज येथे प्रतिकात्मक पुतळयाचे दहन करण्यात येत आहे, या निमीत्ताने सकारात्मक विचारांची संजिवनी घेऊन अहंकार, नकारात्मक विचार व वृत्तीचा नाश करावा, आज शेतक-यावर मोठे संकट आहे, सतत पावसामुळे मोठया प्रमाणात सोयाबीन व कापुस पिकाचे नुकसान झालेले आहे, या नुकसान ग्रस्त शेतक-यांच्या पाठीशी केन्द्र व राज्य सरकार उभे आहे, राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेन्द्रजी फडणवीस यांनी राज्यसरकारच्या वतीने मदत जाहीर केल्यामुळे शेतक-यांना मदत मिळणार आहे, वर्धा लोकसभा क्षेत्रात सोबतच देवळी शहरामध्ये गत १० वर्षामध्ये आपण बघत आहे कि, सकारात्मक विचारामुळे आज देवळी शहराचा चेहरामोहरा बदलत आहे, पुढेही देवळी शहराचाविकास करावयाचा असेल तरसकारात्मक विचार घेऊन सर्वांना पुढे जायला हवे, असे यावेळीमा.खासदार रामदास तडस म्हणालव स्वदेशी हा आत्मनिर्भर आणि विकसीत भारताचा पाया आहे,

आपल्या देशातील लोकांनीबनवलेल्या बनविलेल्या वस्तखरेदी करणे ही महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या जयंती निमीत्य त्यांना खरी श्रध्दाजंलीठरेल व विजयादशमी, संघाचीशताब्धी महोत्सव निमीत्य सर्वांना शुभेच्छा दिल्या. मिरननाथ यात्रा मैदान देवळी येथे मा.खासदार श्री. रामदासजी तडस क्रीडा अकॅडमी देवळी व्दारा आयोजीत भव्य दसरा मेळावा माजीखासदार रामदास तडस यांच्याउपस्थिीती संपन्न झाला. यावेळी अतिथी म्हणून देवळी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजेश बकानेपोलीस निरीक्षक अमोल मंढारकर,तहसीलदार समर्थ क्षिरसागर, माजीनप उपाध्यक्ष डॉ. नरेंद्र मदनकर, राहुल चोपडा, नंदकिशोर वैद्य,विजय गोमासे, दिलीप कारोटकर,मारोतराव मरघाडे, शरद आदमने, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवीकारोटकर, भाजपा शहर अध्यक्ष उमेश कामडी, भाजपा महिलाआघाडी अध्यक्ष विद्या झिलपेयांची उपस्थिती होती. यावेळी देवळी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजेश बकाने यांनी विजया दशमी निमीत्य शुभेच्छा दिल्या व देवळी विधानसभा क्षेत्राचा आमदार म्हणून सर्व समावेशक विकास करण्यासाठी प्राधान्य देणार आहे, तसेच देवळी मध्ये मा.खासदार रामदास तडस यांनी मोठया प्रमाणात निधी आणून विकास केलेला आहे,

या पुढेही शहराच्या विकासासाठी सोबत राहील असेही यावेळी ते म्हणाले. यावेळी पोलीस निरीक्षक अमोल मंढारकर, तहसीलदार समर्थ क्षिरसागर, माजी नप उपाध्यक्ष डॉ. नरेंद्र मदनकर यांनी विजया दशमी निमीत्य शुभेच्छा दिल्या व समोयोचीत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन शुभांगी कुर्जेकर यांनी केले, उपस्थितांचे आभार रवी कारोटकर यांनी मानले कार्यक्रमाला संजय मुजबैले, कवीश सुरकार, योगेश आदमने, अंकित टेकाडे, सुरज कानेटकर, अमोल काकडे, विजय चौधरी, आकाश व-हाड, सतीश भजभज, नाना दुरगुडे, आयुष आंबटकर, मनोज भेंडे, दिपक कामडी, विनोद तेलरांधे, विनाद भगत, नितीन तडस, सारिकाताइ लाकड, ज्योतीताई खाडे, विश्वजिता पोटदुखे व देवळीकर नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *