पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांची सेवाग्राम आश्रमाला भेट; राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी याच्या जयतीनिमित्त पालकमत्री डा. पंकज भोयर यांनी आज महात्मा गांधी यांचे वास्तव्य राहिलेल्या सेवाग्राम आश्रम येथील बापू कुटीला भेट देऊन आदरांजली वाहिली. यावेळी माजी खासदार रामदास तडस, जिल्हाधिकारी वान्मथी सी, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे सचिव विजय तांबे यांची उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी संपूर्ण आश्रमाची पाहणीकली तसेच आश्रमातील गाशाळेलाभेट दिली. गोशाळेत असलेल्या विविध जातीच्या गाईंबद्दलसेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे सचिवविजय तांबे यांच्याकडून माहिती जाणून घेतली तसेच आश्रमातील सोईसुविधांबाबत चर्चा केली. महात्मा गांधीनी दिलेला शांतीव अहिंसेचा संदेश आजच्या तरुण पिढीने मनात रुजविणे आवश्यक असल्याचे मत डॉ.भोयर यांनी यावेळी व्यक्त केले. आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने सकाळी प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रार्थना सभेस नागरिकांनी सहभाग नोंदविला होता. सकाळपासन अखंड सुतकताईचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *