आजपासून अनेक वस्तू होणार स्वस्त!
इलेक्ट्रॉनिक्स आणि घरगुती उपकरणे: एअर कंडीशनर, रेफ्रिजरेटर आणि टीव्ही यांसारख्या वस्तूंचा जीएसटी २८% वरून १८% करण्यात आला आहे. सिमेंट: घर बांधकामासाठी महत्त्वाच्या असलेल्या सिमेंटवरील जीएसटी २८% वरून १८% पर्यंत कमी करण्यात आला आहे. औषधे: अनेक जीवनरक्षक औषधे, निदान किट आणि वैद्यकीय उपकरणांवरील जीएसटी दर १२% किंवा १८% वरून कमी करून ५% किंवा ०% करण्यात आला आहे. यामुळे आरोग्य सेवा अधिक परवडणारी होणार आहे. शिक्षण साहित्य: पेन्सिल, क्रेयॉन, खोडरबर, कंपास पेटी आणि नोटबुक यांसारख्या शालेय वस्तूंवरील जीएसटी दर १२% वरून ५% किंवा ०% पर्यंत कमी करण्यात आला आहे. ऑटोमोबाईल: ३५० सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या मोटरसायकल आणि छोट्या कारवरील जीएसटी २८% वरून १८% पर्यंत कमी झाला आहे. डेअरी आणि पॅकेज्ड फूड: तूप, लोणी, चीज, आणि इतर पॅकेज्ड खाद्यपदार्थांवरील जीएसटी १२% वरून ५% झाला आहे.









