जिल्ह्यात ११४५ ठिकाणी होणार आदिशक्तीच्या मूर्तीची स्थापना

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वधा : शारदीय नवरात्रोत्सवाला सोमवार,२२ सप्टेंबर रोजी प्रारंभ होत आहे. जिल्ह्यात ११४५ ठिकाणांवर आदिशक्ती दुर्गेच्या मूर्त्यांचीप्राणप्रतिष्ठा सार्वजनिक दुर्गा पूजा उत्सवमंडळातर्फे केली जाणार आहे. त्याकरिताशहरासह ग्रामीण भागात जय्यत तयारी सुरू झाली आहे. जिल्ह्यात शारदीय व चैत्र नवरात्र उल्हासपूर्णवातावरणात साजरा करण्यात येते. शारदीय नवरात्रदरम्यान दुर्गा पूजा उत्सव मंडळातर्फे आकर्षक सजावट करून दुर्गा मातेच्या मूर्ती विधिवत स्थापन केल्या जातात. नऊ दिवस विदर्भातील सर्वात मोठा दुर्गा पूजा उत्सव वर्धाजिल्ह्यात साजरा होतो.

चैत्र नवरात्र हे घरी व देवस्थानांमध्ये मोठ्या प्रमाणात साजरे केले जाते. त्या तुलनेत शारदीय नवरात्र उत्सवाला अधिक महत्त्व सार्वजनिक रूपात जिल्ह्यात दिले जात आहे. मागीलवर्षीच्या तुलनेतयावर्षी सार्वजनिक ठिकाणांवर दुर्गा मूर्ती स्थापनकरणाऱ्या मंडळाच्या संख्येत काही प्रमाणात वाढ झाली आहे. यावर्षी हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात १२७ ठिकाणांवर तर पुलगावपोलीस ठाण्याच्या क्षेत्रात १०२ ठिकाणांवर दुर्गामूर्तीची स्थापना करण्यात येईल. त्याकरिता तयारी युद्ध पातळीवर सुरू आहे. दुर्गा मूर्ती सोबतच ग्रामीण व शहरी भागात शारदा मूर्तीचीस्थापना करण्यात येते, हे विशेष !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *