ग्रामपंचायत ग्रामीण प्रशासकीय यंत्रणेचा सर्वात महत्वाचा घटक असून ते विकासाचे केंद्र- खा. रामदास तडस

देवळी/प्रतिनिधी ग्रामीण भारत देशातील बहुतांश लोकसंख्या ही ग्रामीण भागातील गावखेडयात आहे. ग्रामपंचायत हा ग्रामीण प्रशासकीय यंत्रणेचा सर्वात महत्वाचा घटक असून ते विकासाचे केंद्रच आहे. ग्रामीण भागातील विविध विकास कामे करणे यासाठी केन्द्र व राज्य सरकार कटिबद्ध आहे. आज जर देशाचा विकास करावयाचा असेल तर सर्वप्रथम ग्रामीण भागातील प्रत्येक कुंटुंब आत्मनिर्भर व विकसीत होणे आवश्यक आहे. केन्द्र सरकारने ग्रामीण भागातील गावामध्ये शुद्ध व पुरेसे पाणी उपलब्ध करण्यासाठी जलजीवन मिशन व सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनाचे भुमीपूजन, तसेच जिल्हा वार्षीक योजना २१-२२ जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय अंतर्गत व्यायाम शाळा तसेच माझ्या निधीतुन व्यायाम साहित्याचे आज लोकार्पण होत आहे, या विकास कामांचा फायदा गावातील नागरिकांना होणार असल्याचे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी यावेळी केले.

रत्नापूर येथे जिल्हा वार्षीक योजना २१-२२ जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय अंतर्गत व्यायाम शाळा ईमारत व खासदार श्री. रामदासजी तडस यांच्या खासदार स्थानीक विकास निधी अंतर्गत व्यायाम शाळेचे साहीत्य लोकार्पण तसेच रत्नापुर येथे सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन व जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भुमीपूजन (एकुण रु. ३४ लक्ष) खासदार रामदास तडस यांच्या शुभहस्ते, सरपंच सुधिर बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली व उपसरपंच सौरभ कडू, वि.का.से.स.सो. अध्यक्ष किशोर मुडे यांच्य उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी वि.का.से.स.सो सदस्य प्रशांत सायंकार ग्रा पं. सदस्य देविदास वाघ, अयुब अली छाया सोनवणे, विद्या ठाकरे, सचिव कु. वर्षा खंडेराव उपस्थित होते.

प्रास्तावीक संदीप शेंदरे यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन सचिव कु. वर्षा खंडेराव व उपस्थिताचे आभार आभार चेतन फलके यांनी मानले, कार्यक्रमाला रमेशराव कडू, नथ्थुजी कुमरे, सुरेश लाहोरे, गुणवंता कुमरे, धिरज राउत, सुमित पंडित, प्रज्वल भोयर, उमेश आखुड,आकाश निंबोळकर, नयन राउत, खुशाल कन्नाके, रुपेश तोडासे, अनिकेत नेहारे, भुषन राउत, हन ुमान आड े, निखिल गायकडवाड, सागर कडु,विवेक मांगुळकर, राहुल कुमरे,दिपक धुमाळ,रंगराव तोडासे,जीवन महाजन,शुभम हांडे, मंगेश कडू, आदित्य मांगुळकर,राहुल खडसे निलेश ठाकरे, अरविंद आखरे, दिलीप मांगुळकार, अंबादास राऊत, राजु आखुड,कार्तीक कडू सुषमा गायकवाड,निता कुमरे,विशाखा आखरे,छोंडुबाई व रत्नापूर येथील गावकरी उपस्थित होते.