निराधारांचे आधार बनले आमदार समीर कुणावार

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम हिंगणघाट : हिंगणघाट व समद्रपर येथील तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक आ. समीर कुणावार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. समाजातील वचित व निराधार घटकांपर्यंत शासनाच्या कल्याणकारी याजनाचा लाभ प्रभावीपणे पोहोचावा, या उद्देशाने आयोजित या बैठकीत विविध प्रलंबित अर्ज व प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. यावेळी आ. कुणावार यांच्या हस्ते हिंगणघाट येथे ४३० तर समुद्रपूर येथे २९० अशा ७२० पात्र लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेची प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. तसेच लाभार्थ्यांच्या मासिक अनुदानाची नोंद निश्चित करून त्यांना योजनेचा लाभ सुरू करण्यात आला.

आ. कुणावार हे हिंगणघाट व समद्रपूर येथील सजय गाधी निराधार योजना समितीचे स्वतः अध्यक्ष म्हणून कार्यरत असून या प्रक्रियत त वयतिकरित्या लक्ष घालून सातत्याने पाठपुरावा करत असतात. त्यांचे नेतृत्त्व आणि समन्वयामुळे जिल्ह्यातील सर्वाधिक विक्रमी लाभार्थ्यांची नोंद या दोन्ही तालुक्यांत करण्यात आली असून, समाजातील गरजू घटकांपर्यंत योजना पोहोचविण्यात या तालुयांनी जिल्ह्यात आघाडी घेतली आहे. सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे शासनाने संजय गाधी निराधार योजनेअंतर्गत देण्यात येणार्या मासिक अनुदानाची रकम १२०० वरून १५०० रुपयापर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे निराधार व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडण्यास मदत होणार आहे. या योजनेअंतर्गत १८ ते ६५ वयोगटातील डराळी र्घीपरुरी निराधार व्यती, अनाथ मुले, दिव्यांग नागरिक, गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्ण, विधवा व घटस्फोटित महिला, तृतीयपंथी तसेच सिकलसेल आजाराने पीडित नागरिकांना आर्थिक सहाय्य दिले जाते.

यासाठी लाभार्थ्याचे नाव दारिर्द्यरेषेखालील यादीत असणे किंवा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २१ हजार रुपयापर्यंत असणे आवश्यक आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ खऱ्या अर्थाने पात्र व गरजू नागरिकांपर्यंत पोहोचवणे ही प्रशासन व लोकप्रतिनिधींची संयुत जबाबदारी आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवण्याचा आपला संकल्प असून त्यासाठी प्रशासनानेही संवेदनशीलतेने कार्य करावे, असे आ. समीर कुणावार यांनी यावेळी सांगितले. यावळी उपविभागीय अधिकारी आकाश अवतारे, हिंगणघाटचे तहसीलदार योगेश शिंदे, समुद्रपूरचे तहसीलदार कपिल हाटकर, गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर सावसाकळ, गटविकास अधिकारी सतीश टिचकुले तसेच शासन निर्णयानुसार गठीत समितीमध्ये हिंगणघाट व समुद्रपूर येथील नियुत सदस्य आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *