गिट्टी खदानीत बुडून मजुराचा मृत्यू

गिरड/प्रतिनिधी परिसरातील जोगिणंगुफा शिवारातील या गिट्टी खदानीत पाण्याचा ट्रॅक्टर मागे घेत असताना ब्रेक फेल झाल्याने ट्रॅक्टर खदानीत बुडाला. यात मजूर अमोल अंबाडरे (३४) रा. जोगीणगुंफा याचा मृत्यू झाला. सुदैवाने ट्रॅक्टर चालकाने उडी मारल्याने त्याचा जीव वाचला. मिळालेल्या माहितीनुसार ११ रोजी दुपारच्या सुमारात जागीणगुफा शिवारातील गिट्ट खदानीवर ट्रॅक्टरमध्य  पाणी भरण्यासाठी आणले. दरम्यान, ट्रॅक्टर मागे घेत असताना ब्रेक फेल झाल्याने खदानीत ट्रॅक्टर पडला. पाणी भरण्यासाठी अमोल अंबाडरे ट्रॅक्टरवर चढून होता. अचानक ट्रॅक्टर खदानींमध्ये शिरल्याने चालकाने प्रसंगावधान राखून उडी घेऊन स्वत:चा जीव वाचवला. मात्र, अमोल अंबाडरे याचा गिट्टीखदानीत पाण्यात बुडवून मृत्यूझाला. घटनेची माहिती मिळताचअभय मॅडमवार सह ठाणेदारसुनील दहिभाते यांनी आपल्या कर्मचार्यांसह घटनास्थळ गाठून स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने ४ तासानंतर मृतदेह पाण्याबाहेर काढला. पुढील तपास ठाणेदार सुनील दहिभाते यांच्या मार्गदर्शनातसुरू आहे.