मराठा आरक्षणाचा लढा यशस्वी!

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मबइ : मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या असून हैद्राबाद गॅझेटियरचा जीआर त्यांना सोपविण्यात आला आहे, आता दोन दिवसांत कुणबी प्रमाणपत्र वाटपास सुरुवात होणार असल्याचे शिष्टमंडळाचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केले. तसेच त्यांनी मनोज जरांगे यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. यानंतर जरांगेंनी उपोषण सोडायचं काय असे आंदोलकांना विचारले आणि उपोषण सोडले. मागण्या मान्य झाल्यानंतर जरांगे पाटील हे भावूक झाले. त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू वाहिले. आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपोषण सोडण्यास याव अशी मागणी कली मात्र जराग म्हणाले की आपल्याला गॅझेटियर महत्त्वाचे आहे त्यामुळे ते आले किंवा नाही याला महत्व नाही. यानंतर आंदोलनस्थळी गणपतीची आरती करण्यात आली. यावेळी एक मराठा लाख मराठा, जरांगे पाटील जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या जवळपास सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. मनोज जरांगे यांनी उपोषण सोडताच आंदोलकांना एकच जल्लोष कला. मनाज जरागवर, तसच विख पाटील यांच्यावर विजयाचा गुलाल उधळण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *