ट्रेडिंगच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक वर्धा आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
मात्र तांत्रिक तपासाद्वारे त्याचा कोलकाता-मुंबई-नागपूर रूट पॅटर्न लक्षात घेऊन अखेर बेसा, नागपूर येथून त्याला अटक करण्यात आली. त्याला १९ ऑगस्ट रोजी अटक करून २ सप्टेंबरपर्यंत झउठ रिमांड मिळवण्यात आला आहे. तर त्याला सहकार्य करणारा दुसरा आरोपी किरण हिरासिंग पवार (रा. किन्नी किनाळा, ता. घाटंजी, जि. यवतमाळ, वय २९) यालाही १ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींकडून ९ मोबाईल फोन, लॅपटॉप, २२ एटीएम काड, राख रक्कम, सान्याच्या अगठ्या, तसच खडणनण त क्रॉस आणि मर्सेडीज कंपनीच्या दोन कार जप्त केल्या. एकूण ४४.१३ लाखाचा मद्दमाल हस्तगत करण्यात आला आहे.
शिवाय आरोपींनी मुथूट फायनान्स, वर्धा येथे गहाण ठेवलेले ५५८.२ ग्रॅम सोने आणि कोलकात्यात गहाण ठेवलेले सुमारे २०० ग्रॅम सोने तसेच ८.७१ लाखांची बँक रक्कमही गोठविण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस मा. पोलीस अधीक्षक अनराग जन, अपर पालीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, व उपअधीक्षक पुंडलीक भटकर यांचे मार्गदर्शन लाभले. तपास व कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर व त्यांच्यासोबतचे कर्मचारी – पोहवा निकेश गुजर, कुनाल डांगे, स्वनिल भारद्वाज, दिनेश बोधकर, पोलीस कॉन्स्टेबल प्रतिक नगराळे, तसेच चालक मनोज झाडे, संतोष जयस्वाल, राजेश पचारे यांनी मोलाचे योगदान दिले.









