गीमाटेक्स पतसंस्थेची १७ वी वार्षिक सभा उत्साहात पार

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम हिंगणघाट: गीमाटेक्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कामगार कर्मचारी सहकारी पतसंस्थेची १७वी वार्षिक सर्वसाधारण सभा कंपनीच्या आवारात उत्साहात पार पडली. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष व फॅक्टरी मॅनेजर मा. एस. एस. पठाण होते. मख्य पाहण म्हणन महाप्रबधक श्री. विवेक गिरधर, सीए श्री. राहुल बोकडे, श्री. नूर कुरेशी उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सचिव श्री बंडू काटवले यांनी वार्षिक अहवाल तर व्यवस्थापक श्री. सुनील कोटकर यांनी अंदाजपत्रक व गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरवाबाबत माहिती सादर केली.

संस्थच्या वतीन यावर्षीही गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. ६० विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर टिफिन बॉक्स देण्यात आले. आपल्या अध्यक्षीय भाषणात मा. पठाण साहेबांनी उत्कृष्ट प्रशासनामुळे संस्थेची प्रगती साधल्याचे सांगत, सभासदांच्या हितासाठी नव्या योजना राबवण्याचे आश्वासन दिले. तसेच यावर्षी ९.५% लाभांश देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. सभेच सचालन श्री. विनोद गोटे तर आभार प्रदर्शन श्री. संतोष माथनकर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *