जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा असलेले शहर म्हणून नागपूरची नवीन ओळख- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
या जागतिक पुरस्काराबद्दल महामटाच्या अधिकाऱ्याना त्यानी यावेळी शुभेच्छा दिल्या. रामगीरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष उपस्थितीत गिनिज वर्ल्ड रेकार्डचे भारतातील प्रतिनिधी स्वप्नील डोंगरीकर यांनी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांना गिनिज वर्ल्ड रेकार्डमध्ये नाद झाल्याचे प्रमाणपत्र प्रमाणपत्र प्रदान केले. कामठी मार्गावरील डबल डेकर व्हायाडक्ट (मेट्रो) हा जगातील डबल डेकर व्हायाडक्ट आहे. मेट्रो व हायवे वाहतुकीसाठी ५.६३७ कि.मी. लांबीचा सिंगल कॉलम पिल्लरवर उभा असून हा स्थापत्य कलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग करुन बांधलेल्या या उड्डाणपुलाची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकार्डतर्फे नोंद घेतली आहे. यापुर्वी छत्रपतीनगर येथील ३.२ कि.मी. लांबीच्या डबल डक्ट उड्डाणपुलाची निर्मितीसाठी जागतिक स्तरावर नोंद घेण्यात आली होती. नागपूरला या निर्मितीमुळे संत्रा शहरासोबतच पायाभूत सुविधांचे शहर म्हणून नवीन ओळख मिळाली आहे.
या पुरस्काराने नागपूरचा गौरव जागतिक स्तरापर्यंत पोहचला आहे. या डबल डेकर पुलाच्या निर्मितीसोबतच कामठी मार्गावर रेल्वे, महामार्ग वाहतूक तसेच मेट्रो वाहतुकीसाठी जगात प्रथमच अशा प्रकारच्या उड्डाणपुल तयार करण्यात आला आहे. हे जगातील अभियांत्रिकीमधली आश्चर्य आहे. या पुलासाठी १ हजार ६५० टन स्टिलचा वापर करण्यात आला आहे. जगातील पहिल्या सर्वात लांब डबल डेकर व्हायाडक्ट या पुलाचे सर्व देशांना आकर्षण आहे. प्रत्यक्ष निर्मितीसंदर्भातील माहिती घेण्यासाठी अभियांत्रिकी व वास्तुकलतील तज्ञ भेट देवून पाहणी करत आहे. अशा प्रकारच्या डबल डेकर पुलांची निर्मिती करणारे महामेट्रो व नागपूर हे पायोनिअर असल्याचे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. प्रारंभी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. त्यानंतर महामेट्रोतर्फे बांधण्यात आलेल्या भारतातील सर्वात लांब डबल डकर मटा व्हायाडक्ट या पलाच्या निर्मितीसंदर्भातील चित्रफित यावेळी दाखविण्यात आली.
तंत्रज्ञानाचा अतुलनिय वापर करुन उड्डाणपुलावर गड्डीगोदाम, कडबीचौक, इंदोरा चौक, नारी रोड, ऑटोमोटीव्ह चौक या पाचमेट्रो स्थानके बांधण्यात आली आहे. हा उड्डाणपुल चार पदरी असून पहिल्या स्तरावर महामार्ग,दुसऱ्या स्तरावर मेट्रो आणिजमिन स्तरावर आधीच असलेलामहामार्ग आहे. या उड्डाणपुलामुळेकामठी मार्गावरील प्रचंड वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. यापूर्वी छत्रपती चौकाचा समावेश असलल्याउड्डाणपुलाला देखील गिनिजवर्ल्ड रेकार्डमध्ये समावेश करण्यातआला आहे. यावेळी महामेट्रोचे संचालकअनिलकुमार कोकाटे , प्रकल्प संचालक राजीव त्यागी,कार्यकारी संचालक नरेश गुरबानी,महाव्यवस्थापक यतिन राठोड, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक एन व्ही पी विद्यासागर, प्रकल्पसंचालक प्रकाश मुदलियार आदीअधिकारी तसेच गिनिज बुकऑफ वर्ल्ड रेकार्डचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.









