सर्व शेतकऱ्यांना सुखी व समृध्द ठेवा- खासदार अमर काळे यांचे सावंगी येथील श्रीगणेशाला साकडे

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : सावंगी (मेघे) येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण संस्थेत दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सुध्दा श्रीगणेशाची स्थापना करण्यात आली. या गणेशोत्सवात दि. २८.८.२५ ला सायंकाळी होणाऱ्या आरतीला खासदार श्री. अमर काळे यांनी उपस्थिती दर्शविली. आरती नंतर खासदार अमर काळे यांनी श्रीगणेशाचे पुजन करुन श्रीगणेशाकडे सर्व शेतकऱ्यांना सुखी व समृध्द ठेव अशी प्रार्थना केली. आरती नंतर खासदार अमर काळे यांचा श्रीगणेशाची प्रतिमा, शाल वश्रीफळ देऊन खासदार अमर काळेयांचा सत्कार करण्यात आला.यानंतर खासदार अमर काळे यांनी गणशात्सवात सावगी येथ लावलल्याआरोग्य प्रदर्शनीची पाहणी केली.

डॉ. चंद्रशेखर महाकाळकरसंचालक यांनी खासदार अमर काळेयांना प्रदर्शनीतील उपक्रमाविषयी विस्तृत माहिती दिली. प्राप्तमाहितीनुसार यंदाचा गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक असून त्याच दृष्टीकानातन सर्व कायकमाचे आयोजन कल्या जात आहे. तसेच आचार्य विनोबा भावे रुग्णालयातर्फे वैद्यकीय सुविधांचे सुध्दा आयोजन करण्यात येत आहे अशी माहिती दत्ता मेघे उच्च शिक्षण संस्थेचे विशेष कार्य अधिकारी श्री. संजय इंगळे (तिगावकर) यांनी खासदार अमर काळे यांना दिनांक २८.०८.२०२५ ला सायंकाळी महाआरतीचे वेळी दिली. यावेळी संस्थेचे कुलपती मा. श्री. दत्ताजी मेघे, श्री. शेखर शेंडे, श्री. पराग सोमन मु.का.अ. जि.प. वर्धा, संस्थेचे संचालक श्री. महाकाळकर, वैद्यकीय अधिक्षक श्री. अभय मुडे, डॉ. श्री. राजू बोरले, डॉ. गजानन पिसुळकर, डॉ. सौ. श्वेता काळे-पिसुळकर, श्री. सजय इगळे (तिगावकर), श्री. राजेंद्र शर्मा, प्रविण हिवरे, श्री. इकराम हुसेन इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *