ओबीसीतून आरक्षण घेणारच, पाणीही घेणार नाही; मनोज जरांगे पाटील यांची घोषणा
आतापर्यंत तोडगा का काढला नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सोबतच येत्या शनिवारी-रविवारी महाराष्ट्रातला मराठा घरात थांबणार नाही. आम्ही इथून सांगितले, शनिवारी-रविवारी मुंबईत या तर मुंबईच सोडा, इथून १००-२०० किमी रांगा लागतील. आपण जे बोलतो ते करतो. ओबीसीतून आरक्षण घ्यायला मी खंबीर आहे. मराठा समाजाने शांततेत आंदोलन करावे. काहीही झाले तरीओबीसीतूनच आरक्षण घेणार. मुख्यमंत्र्यांनीयाला गर्दी समजू नये तर समाजाची वेदना समजावी असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान, गरीब मराठ्यांची लोक मुंबईतआले. सर्वसामान्य मुंबईकर आणि श्रीमंत मुंबईकर सगळ्या जातीधर्माचे लोक आमच्यागरिब मराठ्यांची सेवा करतायेत. त्यामुळे याला गर्दी समजू नका. राज्यभरातून मुंबईकडे येताना सुरक्षित ठिकाणी पार्किंगमध्ये वाहने पार्क करा, रेल्वेने आझाद मैदानला यावे. वाशी, शिवडी, मस्जिद बंदर कुठेही मैदानात वाहने पार्क करा. इथं वाहने पार्किंग करायला जागा नाही. नवी मुंबईत वाहने लावा तिथून रेल्वेने प्रवास करा असं आवाहन जरांगे पाटील यांनी केले.









