वर्ध्यात आढळला अतिदुर्मिळ ‘अल्बिनो बुलबुल’
प्रतिनिधी/दै. जन-संग्रामवर्धा : निसर्गाची किमयाच न्यारी. रंगसंगती, आकार, अवयव रचना, पंख व अन्य बाबी ज्या फक्त वन्यजीवांच्या लाभल्या आहेत. त्यामुळे निसर्ग निरीक्षण सदैव चालणारी व नव्या जगाची ओळख देणारी प्रक्रिया असते, असे अभ्यासक सांगतात. म्हणून अति दुर्मिळ हा शब्द वन्यजीवांच्या बाबत अनकेदा वापरला जातो. अनेक पक्षी व प्राणी प्रजाती लुप्त होत चालल्याचे सांगण्यात येते. म्हणून त्याचा सांभाळ व निरीक्षण चालत असते.
जिल्ह्यातील प्रादेशिक वनक्षेत्रात प्रथमच अतिदुर्मिळ अल्बिनो बुलबुल पक्षी आढळून आला आहे. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या मानववंशशास्त्र विभागातील असोसिएट प्रोफेसर आणि वन्यजीवप्रेमी डॉ. वीरेन्द्र प्रताप यादव हे नेहमीप्रमाणे आपल्या निसर्गप्रेमी सहकाऱ्यांसह डॉ. पीयूष पतंजलि आणि समीर अवस्थी यांच्यासोबत रविवारी वर्ध्याच्या प्रादेशिक वनक्षेत्रात भ्रमंती करत होते. त्यावेळी त्यांना रस्त्यावर काही पक्षी बसलेले दिसले. वाहन जवळ येताच ते पक्षी उडून रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपांवर जाऊन बसले. त्या पक्ष्यांमध्ये एक पक्षी असामान्यरित्या पांढऱ्या रंगाचा असल्याचे डॉ. यादव यांच्या लक्षात आले.
आपला संशय दूर करण्यासाठी ते त्या पक्ष्याजवळ गेले. पक्ष्यांच्या शेवटीखालील लालसर डाग (अंडर-टेल कव्हर्ट्स/ व्हेंट) पाहून त्यांनी तो अतिदुर्मिळ अल्बिनो बुलबुल असल्याचे ओळखले. या शोधाची खात्री करण्यासाठी त्यांनी मोबाईलने काढलेले छायाचित्र तात्काळ वर्धा जिल्ह्यातील वनसंशोधन केंद्राचे वनरक्षक आणि पक्षीतज्ज्ञ मनेशकुमार लिंगराम सज्जन यांना पाठवले.
या महत्त्वपूर्ण शोधानें प्रभावित होऊन अवघ्या एका तासात वनरक्षक मनेशकुमार हे वर्धा मुख्यालयापासून सुमारे चाळीस किलोमीटर अंतरावरील त्या ठिकाणी पोहोचले. वाघ, बिबट्या, अस्वल आणि विषारी सापांचे वास्तव्य असलेल्या जंगलाच्या आतील भागात डॉ. यादव आणि वनरक्षक मनेशकुमार यांनी दाट झुडपे, उंच गवत आणि सघन वृक्षराजितून अल्बिनो बुलबुलचा पायी पाठलाग केला. वैज्ञानिक अभ्यासासाठी त्यांनी त्या पक्ष्याची छायाचित्रे आणि व्हिडीओ नोंदवले. डॉ. यादव यांनी सांगितले की, साधारणपणे तीस हजार पक्ष्यांमध्ये एखाدا पक्षी अल्बिनो असण्याची शक्यता असते.
बुलबुल प्रजातीमध्ये ही घटना अधिकच दुर्मिळ मानली जाते. पक्ष्यांमध्ये आनुवंशिक उत्परिवर्तनामुळे त्यांच्या शरीरातील नैसर्गिक रंगद्रव्य ‘मेलानिन’ तयार होणे बंद होते आणि त्यामुळे त्यांचा रंग पूर्णतः पांढरा होतो. ही अत्यंत दुर्मिळ जन्मजात अवस्था असून ती पालकांकडून मिळालेल्या जनुकामुळे उद्भवते. अशा पक्ष्यांचे पंख पूर्णतः पांढरे (पूर्ण अल्बिनो) असतात, तर डोळे, चोच आणि पाय गुलाबी किंवा लालसर रंगाचे असतात.
बல்கसंख्य अल्बिनो पक्षी आपले नैसर्गिक आयुष्य पूर्ण करू शकत नाहीत. मेलानिनच्या अभावामुळे त्यांची दृष्टी कमकुवत असते, त्यामुळे त्यांना अन्न शोधण्यात अडचणी येतात. पांढरा रंग असल्यामुळे ते दूरवरून शिकारी प्राणी आणि पक्ष्यांच्या नजरेस पडतात. कमकुवत दृष्टीमुळे त्यांना स्वतःचा बचाव करणे कठीण जाते. तसेच मेलनिन नसल्याने त्यांच्या त्वचेला आणि डोळ्यांना सूर्यप्रकाशाचा दुष्परिणामही सहन करावा लागतो. अनेकदा वेगळे दिसत असल्यामुळे इतर पक्षी त्यांना आपल्या समूहातून दूर करतात आणि जोडीदार निवडण्यातही त्यांना अडचणी येतात.
भारतात प्रथम १८९४ मध्ये तत्कालीन बॉम्बे येथे लेटर बेरी यांनी आंशिक अल्बिनो बुलबुलची नोंद केली होती. त्यानंतर बेकर यांनी १९१६ मध्ये आसाममध्ये, जोशुआ यांनी १९१९ मध्ये तामिनाडुमध्ये, तर घोष आणि खान यांनी २००५ मध्ये मणिपूरमध्ये आंशिक अल्बिनो बुलबुलची नोंद केली. १९२१ मध्ये एस. सी. लॉ यांनी बंगाल प्रेसिडेन्सीमध्ये पूर्ण अल्बिनो बुलबुलची नोंद केली होती. याचा उल्लेख ‘जर्नल ऑफ द बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’मध्ये करण्यात आला आहे. अल्बिनो बुलबुलचे दर्शन अत्यंत दुर्मिळ मानले जाते. महाराष्ट्रात यापूर्वी याच्या फारच मोजक्या नोंदी आढळतात. २०११ मध्ये रायगड जिल्ह्यात पक्षी संशोधक मेश्री आणि सहकाऱ्यांनी प्रथम आंशिक अल्बिनो बुलबुलची नोंद केली. त्यानंतर डॉ. गजेन्द्र निकम आणि सहकाऱ्यांनी २०२१ मध्ये बुलढाणा येथे आंशिक अल्बिनो बुलबुलची नोंद केली. फेब्रुवारी २०२६ मध्ये कोकणातही आंशिक अल्बिनो बुलबुल आढळून आला होता.
रविवारी वर्ध्यात प्रथमच अतिदुर्मिळ अल्बिनो बुलबुलची नोंद डॉ. वीरेन्द्र प्रताप यादव यांनी केली आहे. डॉ. यादव म्हणतात की असा पक्षी दिसणे हे भाग्य्य. आम्हांस तो दिसला आणि कॅमेरात टिपला आला हे अतीव आनंद देणारे क्षण आमच्या आयुष्यात ठरतील.








