राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार पक्षाच्या हिंगणघाट विधानसभा अध्यक्ष पदी इंजि. हुकेश ढोकपांडे यांची नियुक्ती

प्रणय बालपांडे / दै. जन-संग्राम

हिंगणघाट : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा, बुद्धिमान आणि उद्योजक व्यक्तित्व असलेले इंजि. हुकेश दशरथराव ढोकपांडे यांची युवक हिंगणघाट विधानसभा अध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे.

ही नियुक्ती होताच संपूर्ण हिंगणघाट परिसरात आनंदाची लाट पसरली असून, যুবकांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. एक बुद्धिमान अभियंता आणि युवा उद्योजक म्हणून ओळख असलेल्या ई. हुकेश ढोकपांडे यांच्याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.

ही नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, प्रदेश सरचिटणीस सुनील राऊत, युवक जिल्हाध्यक्ष प्रणव कदम तसेच पक्षाचे ज्येष्ठ नेते मंडळी यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

यावेळी त्यांना अधिकृत नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वाची प्रशंसा करत, युवकांना नवे दिशा देणारे नेतृत्व मिळाल्याचे सांगितले.

इंजि. हुकेश ढोकपांडे यांनी सांगितले : मी पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्ण निष्ठेने पार पाडणार असून, युवकांच्या हक्कांसाठी आणि विकासासाठी सातत्याने काम करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *