वर्धा येथे आद्यवस्त्र निर्माते भगवान श्री जिह्नेश्वर जन्मोत्सव साजरा
प्रतिनिधी / दै. जन-संग्रामवर्धा : स्थानिक आकरे मंगलकार्यालय वर्धा येथे काल रविवार दिनांक ३० ऑगस्ट ला साळी (विणकर) समाजाचे आराध्य दैवत आद्यवस्त्र निर्माते शिवपुत्र भगवान श्री जिह्नेश्वर जन्मोत्सव वर्धा जिल्ह्यातील सर्व साळी समाज बांधवांतर्फे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँक ऑफ इंडिया चे सेवानिवृत्त मुख्य प्रबंधंक श्री प्रकाश बुरांडे हे होते. कार्यक्रमाचे उद्घाटक श्री सुधीर पांगुळ, नगराध्यक्ष वर्धा व श्री सुरेशभाऊ वाघमारे, माजी खासदार वर्धा हे होते.
कार्यक्रमच्या उपध्यक्षा सौ योगिताताई बकारे होत्या. प्रमुख पाहुणे श्री रवींद्र जोगी, सेवानिवृत्त लेखाधिकारी, कृषी विभाग अमरावती, श्री विलास ताठे, माजी अध्यक्ष मराठवाडा साळी समाज मंडळ, सौ स्वातीताई वि ताठे अध्यक्ष जिह्नेश्वर महिला प्रतिष्ठान परळी वैजनाथ, सल्लागार स्वकुळसाळी ज्ञातिगृह आळंदी, श्री प्रवीण जारी, प्राध्यापक इंजिनियरिंग कॉलेज, श्री प्रल्हादराव कोठेकर सेवानिवृत्त भारतीय वायुदल अधिकारी, सौ दीपिकाताई आडेपवार नगरसेविका वर्धा, श्री वैभव सरोदे केंद्रप्रमुख अमरावती, डॉ दिपाताई यावलकर प्राध्यापिका शासकीय अभियांत्रिकी कॉलेज नागपुर हे होते.प्रमुख उपस्थिती श्री राम कांबळे, नायब तहसीलदार वर्धा, श्री संजय चिंगलवार नायब तहसीलदार वर्धा, श्री शरद देशकर, श्री अशोकराव चपटे, प्रशासकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट, सेवानिवृत्त प्राध्यापक श्री मनोहर पिंपळे, श्री प्रशांत बकारे, श्री प्रल्हादराव साळी, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, श्री निलेश बोन्द्रे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांची होती. सुरवातीला सर्व पाहुण्याच्या हस्ते दीप प्रज्वलन, भगवान श्री जिह्नेश्वर फोटो चे पूजन व श्री संजय टेकाळे व सौ संगीता टेकाळे यांना महाआरती चा मान देण्यात आला. त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सुरेंद्र लव्हाळे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय श्री दत्तात्रय दिवटे यांनी करून दिला. सौ साधना कोठेकर यांनी भगवान जिह्नेश्वर जन्मोत्सवची कथा वाचली. श्री मिलिंद भागवत यांनी राष्ट्रीय हातमाग दिन कधी आणि केव्हापासून साजरा करतात याबद्दल चा इतिहास सांगितला. त्यानंतर दहावी आणि बारावी मध्ये गुणानुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय आलेल्या विदयार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते भेटवस्तू आणि रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला. यानंतर श्री वैभव सरोदे यांची केंद्रप्रमुख म्हणून पदान्ती झाल्याबद्दल, प्रा.दिपाताई यावलकर यांना आचार्य ही पदवी प्राप्त केल्याबद्दल, व श्री निलेश बोन्द्रे यांची सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर पदोन्नती झाल्याबद्दल सर्व पाहुण्याच्या हस्ते शाल श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन अभिनंदन आणि कौतुक करण्यात आले. यानंतर उद्घाटक माजी खासदार वर्धा श्री सुरेशभाऊ वाघमारे, उद्घाटक नगराध्यक्ष वर्धा श्री सुधीरभाऊ पांगुळ, प्रमुख पाहुणे श्री रवींद्र जोगी, श्री विलासराव ताठे, सौ स्वातीताई ताठे, दीपिकाताई आडेपवार यांची भाषणे झाली.
अध्यक्षीय भाषण श्री प्रकाश बुरांडे यांनी केले. या कार्यक्रमनिमित्त्या चित्रकला स्पर्धा घेण्यात आली यामध्ये चि आदित्य भगवत, आर्यन बोन्दरे, ईशांत भागवत यांना प्रथम, द्वितीय तृतीय पारितोषिक आणि भेटवस्तू देण्यात आली. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे बालवाडी ते पुढे शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना साळी समाज मंडळ वर्धा व भगवान श्री जिह्नेश्वर जन्मोत्सव समिती वर्धा तर्फे शैक्षणिक भेटवस्तू देण्यात आली. यानंतर सर्व मान्यवरांनी व उपस्थित सर्व समाज बंधू भगिनी यांनी तसेच उपस्थित मित्र परिवार यांनी भोजनाचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाच्या उत्तरधार्त महिलांच्या खेळाची मेजवानी होती. यामध्ये एका मिनिटात जास्तीत जास्त उखाणे म्हणण्याची स्पर्धा hoti यामध्ये २३ महिलांनी भाग घेतला तर प्रथम पुरस्कार सी सिंधुताई दिवटे यांना मिळाला. दुसऱ्या स्पर्धेत प्रथम पुरस्कार सौ प्रीतीताई जारी यांना मिळाला. या दोन्हीना मान्यवरांच्या हस्ते पैठणी व पुष्पगुच्छ देण्यात आले.
कार्यक्रमचे बहारदार संचालन सौ अश्विनी शिंगणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता श्री दत्तात्रय दिवटे, मिलिंद भागवत, संजय टेकाळे, विष्णुंपंत बोन्दरे, प्रितेश चपटे, संजय शिंगणे, संदीप जारी, अमोग वकारे, कृष्णा ताठे, निखिल वकारे, रत्नाकर जोगी, राजेश कोठेकर, राकेश कोठेकर, सुरेंद्र लव्हाळे, निलेश खंदारे, निलेश कोठेकर, एकनाथ जोगी, सिंधुताई दिवटे, स्वाती भागवत, संगीता टेकाळे, साधना कोठेकर, सोनल कोठेकर सोपाली बोन्दरे, प्रिया चपटे, याव्यतिरिक्त आनखी बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले.








