रसायन भरलेला २२ चाकी टँकर उलटला

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम पुलगांव : सुरतहून नागपूरला इंडोरामा उद्योगामध्ये रसायन घेऊन जाणारा २२ चाकी टँकर पुलगाव येथे कॅम्प चौफुलीजवळ दपारी ४ वाजता उलटला. यातील रसायन नाल्यात वाहून गेले. या नाल्यातील पाणी पुढे वर्धा नदीला जाऊन मिळते. त्यामुळे या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी व जल प्रदूषणाचा धोका निर्माण झालेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरत येथून नागपूरकडे एच. एल. ०१ ए. बी. ८८८६ क्रमांकाचा २२ चाकी टँकर रसायन घेऊन निघाला. हे रसायन इंडोरामा उद्योग समुहामध्ये नेण्यात येणार हात. इडारामा उद्याग समहामध्य या रसायनापासून धागा निर्मिती होत असल्याचे कळते. सुरतच्या अदानी उद्योग समूहाकडून हे रसायन नागपूरला येत होते.

मात्र, औरंगाबादनागपूर महामार्गावरील पुलगाव वळण रस्त्यावर दुपारी ४ वाजता हा टँकर उलटला. त्यामुळे टँकरमधील रसायन नाल्यात वाहन गेले. अपघात घडल्यानंतरअर्धा तास वाहतूक कोंडी झाली.पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून वाहतूक सुरळीत केली. अपघातात जिवितहानी झालीनसली तरी टँकरमधील रसायन नाल्यात वाहून गेल्याने हेचनाल्यातील रसायन वर्धा नदीला मिळणार असल्याने जलप्रदूषणाचाधोका निर्माण झाला आहे. इंडोरामा उद्योग समुहामध्ये या रसायनापासून धागा निर्मिती होत असल्याचे कळते. सुरतच्याअदानी उद्योग समूहाकडून हेरसायन नागपूरला येत होते.दुपारी ४ वाजताच्या दरम्यानहा अपघात झाला. या टँकरचे नाल्यामध्ये पडलेले रसायननाल्याच्या माध्यमातून नदीमध्ये जाणार आहे. नदीचे पाणी अनेकगावांमध्ये पिण्याकरिता उपयोगातआणले जाते. प्रशासनाने या रसायनाचे परीक्षण करून ते आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे का? याचा तपास करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणेनदीमध्ये हे प्रदूषित रसायनयुत पाणी जाऊ नये, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *