राज्यातील १६९ खेळाडूंचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मान

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम पुणे : महाराष्ट्र राज्याने खेळाला नेहमी प्रोत्साहन दिले आहे. छत्रपती शाहू महाराजांनी कुस्तीसह अन्य खेळांना प्रोत्साहन देत खेळाडूंना मदत केली. त्यामुळेच खेळासह देशाच्या प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्राचे योगदान नेहमीच अग्रभागी राहिले आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी शुक्रवारी केले. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्यावतीने आयोजित शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार ( सन २०२२-२३ व २०२३-२४) वितरण सोहळा बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात आज राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, पणन मंत्री जयकुमार रावल, क्रीडा सचिव अनिल डिग्गीकर, क्रीडा आयुक्त हिरालाल सोनवणे आदी उपस्थित होते.

माजी राष्ट्रीय कबड्डीपटू, संघटक शंकुतला खटावकर यांना सन २०२३-२४ चा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. तर सन २०२२-२३ चा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार बॅडमिंटन प्रशिक्षक प्रदीप गंधे यांना प्रदान करण्यात आला. तसेच २०२३-२४ चा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार पॅरा ऑलिम्पिक पदक विजेता सचिन खिलारी, जागितिक विजेते आर्चर आदिती स्वामी, ओजस देवतळे , क्रिकेटपटू शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल यांना सन्मानित करण्यात आले.

जीवन गौरव पुरस्कारसाठी ५ लाख, शिवछत्रपती पुरस्करासाठी ३ लाख रूपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप होते. या पुरस्कारांसह यावेळी दोन्ही वर्षाचे उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक- जिजामाता पुरस्कार, खेळाडूंसाठीचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा साहसी पुरस्कार ,दिव्यांग खेळाडूंचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार असे ५ प्रकारचे पुरस्कार १६९ खेळाडू व प्रशिक्षक यांना प्रदान करण्यात आले. राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले, राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये आज क्रीडा संकुल उभे करण्यात राज्य शासनाच्या क्रीडा विभागाने पुढाकार घेतला आहे. अशा वेळी शाळा महाविद्यालयाने आपल्या विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे खेळ हे ही एक करियर ची संधी आहे हे विध्यार्थ्यांमध्ये रुजविले पाहिजे.

मेट्रो शहरातील मोठी मैदाने शाळा महाविद्यालयातील विध्यार्थ्यांना सहजरित्या उपलब्ध करुन दिली पाहिजेत अशी सूचना त्यांनी यावेळी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी,महाराष्ट्रातील खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगली कामगिरी करत असल्याचेसांगून, त्यांना सर्वोतोपरी मदत करण्यासाठीराज्य सरकार नेहमीच प्रयत्न करत राहील आहि ग्वाही दिली. शिव छत्रपती शिवाजीक्रीडा पुरस्कार म्हणजे खेळाडूंना मिळालेलीराज मान्यता आहे. या पार्श्वभूमीवर या पुरस्कार विजेत्यांनी यापुढे खेळ, खेळाडूच्याविकासासाठी काय करता येईल याचाविचार करून नवीन खेळाडूंना योग्य दिशा दाखविण्याची कामगिरी केली पाहिजे अशीअपेक्षा त्यांनी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *